एक्स्प्लोर

Rs. 2000 notes : मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, पण त्यानंतर काय?

Rs. 2000 notes Exchanges : आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठीची मुदत वाढवून दिली आहे.

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा (Rs. 2000 notes) व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे. 

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे.  एकाच वेळी कमाल 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

आरबीआयनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. 

7 ऑक्टोबरनंतर काय?

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 8 ऑक्टोबरपासून आरबीआयने निश्चित केलेल्या केंद्रात 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहे. 

19 मे 2023 रोजी घेतला होता RBI ने निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने लोकांना 4 महिन्यांची मुदत दिली होती. जेणेकरून ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या जुन्या नोटा सहज बदलू शकतील. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत होती. मात्र, आरबीआयने आढावा घेत नोटा बदलून देण्यासाठी मुदत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्याच 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची मर्यादा घातली आहे.

2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय का?

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.  सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget