एक्स्प्लोर

RBI Guidelines: लोन अकाउंटवरील पेनल्टीबाबत RBI कडून गाईडलाईन्स जारी; केलाय 'हा' मोठा बदल

RBI Guidelines: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज खात्यातील दंड वसूल करण्यासाठी बँकांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

RBI Guidelines: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत लोन अकाउंट्समधील पेनल्टीबाबत अनेक नियमांबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे की, बँका आणि  रेगुलेटेड एंटिटी आपला महसूल वाढवण्यासाठी लोन अकाउंट्सवर पेनल्टीचा पर्याय वापरू नये. 

रिझर्व्ह बँकेकडून नियम जारी 

रिझर्व्ह बँकेनं एक परिपत्रक जारी केलं आहे, ज्या अंतर्गत बँकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, लोन अकाउंट्सवर पेनल्टीच्या नियमांचं कसं पालन करु शकतात, या सूचना परिपत्रकात सांगण्यात आल्या आहेत. बँका कर्जावर आकारल्या जाणार्‍या व्याजात दंडाची भर घालत आहेत आणि त्या आधारावर कर्जदारांकडून व्याजावर व्याज आकारत आहेत, अशा अनेक अलिकडच्या घडामोडींनंतर RBI नं हा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार, कर्जाचे हफ्ते चुकल्यास, बँकांकडून आकारला जाणारा दंड हा दंडात्मक व्याज म्हणून नव्हे तर दंडात्मक शुल्क म्हणून गणला जाईल.

RBI कडून ट्विटरद्वारे माहिती 

भारतीय रिझर्व्ह बँकेनं बदललेल्या नियमांची माहिती अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. ट्वीटमध्ये RBI नं परिपत्रक शेअर केलं आहे. परिपत्रकामध्ये बदललेल्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

RBI नं जारी केलेल्या गाईडलाईन्स कधीपासून लागू होणार? 

आरबीआयच्या परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्स पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. स्मॉल फायनान्सेस बँक, लोकल एरिया बँक आणि रिजनल रुरल बँकांना नवा नियम लागू असेल, तसेच, पेमेंट बँकांनाही हा नियम लागू होईल. सर्व प्रायमरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, एनबीएफसी आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या अखिल भारतीय वित्तीय संस्था जसं, एक्जिम बँका, NABARD, NHB, SIDBI आणि NaBFID सारख्या वित्तीय संस्था देखील RBI च्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेत येतील.

रिझर्व्ह बँकेने लाँच केले 'उद्गम' वेब पोर्टल

देशभरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपये बेवारसपणे पडून आहेत. या रक्कमांवर कोणीही दावा केला नाही. परंतु सामान्य लोकांना आपल्या अशी बँकेतील रक्कम शोधण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'उद्गम'  (UDGAM) नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे (RBI Launches UDGAM For Unclaimed Deposits). या पोर्टलद्वारे कोणतीही व्यक्ती बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधू शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

RBI Launches UDGAM : बातमी कामाची! रिझर्व्ह बँकेने लाँच केले 'उद्गम' वेब पोर्टल; 'असा ' होणार तुमचा फायदा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget