Ratan Tata Speech: तुम्हाला संदेश द्यायचाय तो मनातून आलेला असेल, रतन टाटा यांचं 'ते' भाषण ऐकून पंतप्रधान मोदींनी वाजवलेल्या टाळ्या
Ratan Tata Last Speech in Hindi : रतन टाटा यांनी त्यांचं हिंदी भाषेतील अखेरचं सार्वजनिक कार्यक्रमातील भाषण 28 एप्रिल 2022 रोजी केलं होतं.
Ratan Tata Last Speech in Hindi नवी दिल्ली: देशातील उद्योगविश्वाचे शिल्पकार रतन टाटा(Ratan Tata) यांचं बुधवारी रात्री निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. रतन टाटा यांचं आयुष्य सर्वसामान्य भारतीयांसाठी प्रेरणादायी राहिलेलं आहे. कोट्यवधी भारतीयांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळत असे. टाटा यांच्या निधाननंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हारल होत आहे. रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आसाममधील कार्यक्रमात भाषण केलं होतं. आसाममधील कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी रतन टाटा उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी भाषण केलं होतं.
आसाममध्ये 28 एप्रिलला 2022 कॅन्सर रुगणालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्यासह इतर मान्यवर मंचावर होते. टाटा ट्रस्टच्या भागिदारीतून आसाममध्ये कॅन्सर रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यासाठी रतन टाटा यांना त्या उद्घाटन सोहळ्यास आमंत्रित करण्यात आलं होतं.
तुम्हाला संदेश द्यायचाय तो मनातून आलेला असेल
रतन टाटा यांनी त्या कार्यक्रमात भाषण करताना सुरुवातीला इंग्रजीतून संवाद साधला होता. मी हिंदी बोलू शकत नाही त्यामुळं इंग्रजीतून बोलतो, मात्र तुम्हाला जो संदेश पाठवायचा आहे तो सारखाच असेल, माझ्या मनातून आलेला असेल, असं आसामच्या जनतेला सांगितलं.
आसामचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आज आसाम जगाला सांगेल की भारताचं एक छोटं राज्य कॅन्सरवरील उपचार करु शकतं. देशातील दुसऱ्या राज्यात जी व्यवस्था नाही ती आसाममध्ये आहे. कॅन्सर हा श्रीमंत माणसाचा आजार राहिलेला नाही. लाखो लोकांना त्यांचा संसर्ग होत आहे. आसाममध्ये कॅन्सर रुग्णालयाचं उद्घाटन होत आहे. आसामचे मुख्यमंत्री हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो कारण ते आसामला विसरले नाहीत. आसाम राज्य प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यामुळं भारताचा झेंडा आणि आपला देश जगात पुढं जाईल, असं रतन टाटा म्हणाले.
रतन टाटा यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांचे आभार मानले होते. माझ्या उर्वरित आयुष्यात आसामला मदत करण्यासाठी काम करेन, असं रतन टाटा यांनी असं म्हटलं होतं. आसाम राज्याच्या कामाची दखल इतरांकडून घेतली जाईल, असंही ते म्हणाले.
इतर बातम्या :