एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी, 2000 रुपये किती शेतकऱ्यांना मिळाले? सरकारकडून आकडेवारी जाहीर

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना 2000 रुपये याद्वारे दिले जातात.

वाराणसी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या बनौली गावातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणात आली.  20 व्या हप्त्याच्या माध्यमातून 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. 

पीएम किसान सन्मान निधीच्या  20 व्या हप्त्याची रक्कम 9 कोटी 70 लाख  33 हजार 502 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात आले. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. केंद्र सरकारनं 20 व्या हप्त्याद्वारे 20 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम कोणतेही मध्यस्थ, कोणत्याही कट कमिशनशिवाय, हेराफेरीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते, असं म्हटलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचा सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे.  आज उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील बनौली गावातून 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली. आज शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याचे  2000 रुपये जमा करण्यात आले असून यापूर्वी  19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.  तर,  18 व्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्रातील वाशिम येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. 

पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. म्हणजेच पहिल्या हप्त्यापासून जे पात्र शेतकरी आहेत. त्यांना 20 हप्त्यांचे मिळून 40000 हजार रुपये मिळाले आहेत. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाते. 

पीएम किसान योजनेचे पात्रतेच्या अटी?

संबंधित शेतकरी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे.शेतकऱ्याच्या नावावर शेती असावी. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. शेतकऱ्याला 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळत नसावी. शेतकरी आयकर भरत नसावा. 

एखाद्या शेतकऱ्याला नव्यानं नोंदणी करायची असल्यास त्याला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथं New Farmer Registration वर क्लिक करा.  आधार नंबर आणि कॅप्चा नोंदवा. माहिती भरल्यानंतर येस वर क्लिक करुन फॉर्म सबमिट करा. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Embed widget