एक्स्प्लोर

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.

PM Kisan 17th Installment : केंद्र सरकारकडून सर्वसामान्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते. शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ मिळतो. शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

पंतप्रधान किसान योजनेच्या हफ्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक निधी मिळतो. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 16 वाह हफ्ता हस्तांतरित करण्यात आला होता.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये 

आता शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. सुमारे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान निधी योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी सहा हजार रुपये निधी मिळतो. हा निधी तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. ही रक्कम दर चार महिन्यांनी दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात.

शेतकऱ्यांसाठी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत आता शेतकरी पुढील 17 व्या हफ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हफ्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होईल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता जून किंवा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

पंतप्रधान निधी योजनेचा 16 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील 17 वा हफ्ता त्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हफ्ता केव्हा जमा होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पंतप्रधान किसान योजनेचा 17 वा हफ्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. पीएम किसान योजनेच्या सतराव्या हफ्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदी करणेही आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्यापासून वंचिंत राहावं लागेल.

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget