एक्स्प्लोर

PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?

PM Kisan E-KYC : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट असून ई-केवायसी 30 जूनपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे.

PM Kisan E-KYC मुंबई : पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास त्यांनी ई-केवायसी 30 जूनपूर्वी करुन घ्यावी.  ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.

ई केवायसी कशी करायची?

पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरु ठेवण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. पीएम किसान सनन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. पीएम किसान सन्मान निधीच्या  लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. 

सीएससी केंद्र आणि मोबाईलवरुन ई-केवायसी

पीएम किसानची ई केवायसी करायची असल्यास शेतकरी बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करण्यासाठीजवळच्या सामायिक सुविधा केंद्राला (CSC Center) भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करु शकतात. तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर 'पीएम-किसान' मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याव्दारे ई-केवायसी पूर्ण करू शकतील. ही केवायसी पूर्ण करण्याची मुदत 30 जूनपर्यंत आहे. 

दरम्यान, वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात मदत करतील अशी माहिती आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्त्यांची रक्कम जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली होती. फेब्रुवारी 2019 पासून मार्च 2026 पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम 13 मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वसाधारणपणे पीएम किसानच्या दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी ठेवला जातो. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 23 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Embed widget