एक्स्प्लोर

नवीन वर्षात सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, पेट्रोलच्या दरात होणार एवढ्या दराची घसरण 

नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या आहेत. त्यामुळं येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Petrol Price : नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळं पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते.

नवीन वर्षात सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

गुरुवारी आंतरराष्ट्रायी बाजारात कच्च्या तेलाच्या भावात सुमारे पाच टक्क्यांची घसरण झाली. मागणीत घट आणि अमेरिकन इन्व्हेंटरीमध्ये वाढ हे याचे कारण आहे. त्याचा फायदा सर्वसामान्यांना कधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतील? तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरनंतर सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच नवीन वर्षात सर्वसामान्यांना स्वस्त पेट्रोलची भेट मिळू शकते. विश्लेषकांच्या मते जानेवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 ते 5 रुपयांची घसरण होऊ शकते. मात्र, आगामी काळात ओपॅकची बैठकही खूप महत्त्वाची ठरणार आहे. ज्यामध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनातील कपात मार्च 2024 पर्यंत वाढवली जाऊ शकते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या निर्देशांकात घसरण होऊ शकते, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यानंतरही रुपयाच्या घसरणीबाबत सर्वात मोठी चिंता कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 83 ची पातळी ओलांडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांची वाढ आणि घसरण या दोन्ही गोष्टी कच्च्या तेलाच्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्याच्या पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती काय झाल्या आहेत हे देखील सांगूया. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याबाबत तज्ज्ञ काय भाकित करत आहेत?

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

गुरुवारी तेलाच्या किंमती जवळपास 5 टक्क्यांनी घसरन चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि आशियातील कमकुवत आकडेवारीनंतर जागतिक तेलाच्या मागणीची चिंता असल्याचे सांगितले जाते. ब्रेंट क्रूड तेल 3.76 डॉलर किंवा 4.6 टक्क्यांनी घसरुन प्रति बॅरल 77.42 डॉलरवर बंद झाले.

अमेरिकन आकडेवारी आणि चीनची मागणी

सात महिन्यांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये यूएसमध्ये किरकोळ कच्च्या तेलाच्या विक्रीत घट झाली आहे. इतर डेटानंतर हा अहवाल आला आहे. या काळात मोटार वाहनांची विक्रीत होणाऱ्या खर्चात घट झाली. यामुळं चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीस मंद मागणीकडे लक्ष वेधले गेले. ज्यामुळं फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर वाढीची अपेक्षा आणखी मजबूत झाली आहे. ओपेक आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या दोघांनीही चौथ्या तिमाहीत पुरवठा कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. चीनच्या आर्थिक स्थितीमुळे मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

ओपेक बैठकीवर लक्ष 

एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी करन्सी हेड अनुज गुप्ता यांच्या मते, गुंतवणुकदारांचेही डोळे ओपेकच्या पुढील बैठकीकडे आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. ते म्हणाले की तेल उत्पादनातील कपात मार्च तिमाहीपर्यंत वाढविली जाऊ शकते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. पण या वाढीचा तितकासा परिणाम होणार नाही. सौदी अरेबिया आणि रशिया या दोन्ही देशांकडून उत्पादनात कपात केली जात आहे. जेणेकरून कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल किमान 80 डॉलरवर ठेवता येईल. कोविडमुळं होणारं नुकसान कमी करण्यासाठी हे केले जात असल्याचे दोन्ही देशांचे म्हणणे आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत अनुज गुप्ता म्हणाले की, डिसेंबरमध्ये दर कमी होतील अशी फारच कमी परिस्थिती आहे. सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या कच्च्या तेलात स्थिरतेची वाट पाहत आहेत. नवीन वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन ते पाच  रुपयांनी कमी होऊ शकतात.

रुपयाची घसरणही चिंतेची बाब 

केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, डॉलरच्या निर्देशांकात घसरण होत आहे. सध्या डॉलर निर्देशांक 104 च्या पातळीवर आला आहे, जो येत्या आठवड्यात 102 च्या पातळीवरही जाऊ शकतो. त्यानंतरही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही मोठी चिंतेची बाब आहे. देश 80 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो. रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ भारताला कच्च्या तेलाच्या महागाच्या दिशेने घेऊन जाते. त्यामुळं भारताची व्यापार तूट वाढत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतील हे सांगता येत नाही.

भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत

दुसरीकडे, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 21 मे रोजी दिसून आला. त्यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील कर कमी केला होता. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी करून किंवा वाढवून किमतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलू लागल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी विक्रमी वेळेत कोणतेही बदल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

नवी दिल्ली - पेट्रोलचा दर: 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता - पेट्रोलचा दर: 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबई -पेट्रोलचा दर: 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई - पेट्रोलचा दर: 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 94.24 रुपये प्रति लिटर
बंगळुरु - पेट्रोल दर: ​​101.94 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​87.89 रुपये प्रति लिटर
चंदीगड - पेट्रोलचा दर: 96.20 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 84.26 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम - पेट्रोल दर: ​​97.18 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​90.05 रुपये प्रति लिटर
लखनौ - पेट्रोलचा दर: 96.57 रुपये प्रति लिटर, डिझेलचा दर: 89.76 रुपये प्रति लिटर
नोएडा - पेट्रोल दर: ​​96.79 रुपये प्रति लिटर, डिझेल दर: ​​89.96 रुपये प्रति लिटर

महत्त्वाच्या बातम्या:

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या दरांत वाढ, देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sugriv Karad News : कोण आहे सुग्रीव कराड? संतोश देशमुख हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 28 March 2025Asim Sarode On Koratkar Case : प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकील असीम सरोदे आणि इंद्रजीत सावंत काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Embed widget