एक्स्प्लोर

'या' ग्राहकांसाठी डिझेलमध्ये 25 रुपयांची दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर

Fuel Price updates : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम आता भारतातील ग्राहकांवर होत आहे. घाऊक ग्राहकांना आता डिझेलसाठी प्रति लीटर 25 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

Diesel Price Hike:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम आता भारतातील इंधन दरावरही होऊ लागला आहे. याआधी विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात दरवाढ झाल्यानंतर आता घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 25 रुपयांची दरवाढ सहन करावी लागणार आहे. मात्र, या दरवाढीचा परिणाम पेट्रोल पंपावरून वाहनांमध्ये डिझेल भरणाऱ्या ग्राहकांवर होणार नाही. किरकोळ ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. 

मुंबईत घाऊक ग्राहकांसाठी डिझेलचा दर 122.05 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर, पेट्रोल पंपांवर 94.14 रुपये प्रतिलिटर या दराने डिझेल विकले जात आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील पेट्रोल पंपावर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर, घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत 115 रुपये प्रति लिटर आहे. 

>> देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे प्रति लिटर दर काय? 

मुंबई : पेट्रोल -109.98 रुपये, डिझेल - 94.14 रुपये
दिल्ली:  पेट्रोल - 95.41 रुपये, डिझेल - 86.67 रुपये   
चेन्नई: पेट्रोल - 101.40 रुपये, डिझेल - 91.43 रुपये
कोलकाता: पेट्रोल - 104.67 रुपये, डिझेल - 89.79 रुपये

तुमच्या शहरातील इंधन दर काय?

इंधन कंपन्यांनी आज नवीन इंधर दर जाहीर केले आहेत. आजही इंधन दरात कोणतेही बदल झाले नाहीत. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 

>>  महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील इंधन दर काय?

मुंबई - पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

पुणे – पेट्रोल 109.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.31 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 110.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर

नागपूर - पेट्रोल 109.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 110.09 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर

अहमदनगर – पेट्रोल 109.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.35 रुपये प्रति लिटर

अमरावती - पेट्रोल 111.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.74 रुपये प्रतिलिटर

ठाणे- पेट्रोल 109.41 रुपये तर डिझेल 94.28 रुपये प्रति लिटर

>> पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget