एक्स्प्लोर

Petrol Diesel Price: अमेरिकेत महत्त्वाची घडामोड, कच्च्या तेलाचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. मात्र, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) गुरुवारी घसरण झाली. अमेरिकेत रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप टळल्याचे वृत्त समोर आल्याने कच्च्या तेलाच्या दरात जवळपास तीन टक्क्यांनी घसरण झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाटी टांगती तलवार आणि पुरवठा साखळीची चिंता यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली होती. तर, दुसरीकडे आज भारतातील इंधन कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले (Today Petrol Diesel Price)आहेत. भारतातील ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. देशातील इंधन दर स्थिर आहेत. 

अमेरिकेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर कर्मचारी संघटनांसोबत करार झाल्यानंतर हा संप टळला आहे. त्याचा परिणाम तेल बाजारावर दिसून आला. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 90.72 डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. त्याशिवाय, WTI क्रूड ऑईलचा दर 84.94 डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असली तरी भारतीयांना कोणताही दिलासा मिळाला नाही. 

देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर असा दर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईत मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.

राज्यातील प्रमुख शहरात दर काय?

उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. राज्याच सर्वाधिक दर परभणीमध्ये आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget