Petrol Diesel Price Today: पेट्रोल, डिझेलचे दर झाले अपडेट; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी (Crude Oil Production) केले होते. तर, दुसरीकडे रशियाने आपले उत्पादन वाढवले होते. त्याच्या परिणामी आणि इतर काही कारणांमुळे बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) घसरण दिसून आली. कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर (Today's Petrol and Diesel Price) केले आहेत. आजही पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. ही घसरण पुढील वर्षी जानेवारी महिन्यातही सुरू राहण्याचा अंदाज आहे. कच्च्या तेलाचे दर घसरत असताना दुसरीकडे भारतात इंधन कंपन्यांनी ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. मागील पाच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
देशातील प्रमुख शहरातील दर
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.