एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना झटका? पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट

Petrol Diesel Price Today 1st November 2022: महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Petrol Diesel Price Today 1st November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे एक नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कपात होईल अशी चर्चा सुरू होती. काही वृत्तांमध्ये 40 पैसे प्रति लिटर दर कपात होणार असल्याचे म्हटले जात होते. टप्प्याटप्प्याने ही दर कपात लागू होणार होती. या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today) दर जाहीर केले. मंगळवारी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. 

देशात 22 मे नंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. पाच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहे. तर, दुसरीकडे राज्यात जुलै महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्य सरकारने कर कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली होती. 

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे.  मंगळवारी सकाळी WTI क्रूड ऑईलचा दर 86.04 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तर, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 94.83 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने या महिन्यापासून तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील कच्च्या तेलाच्या मागणीच्या दोन टक्के इतकी कपात असणार आहे. येत्या काही दिवसात ही कपात लागू होणार आहे. 

चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर 

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर इतका आहे.  कोलकात्यात 106.03 रुपये प्रति लिटर, मुंबईत 106.31 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर इतका आहे. डिझेलच्या दरातही कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दिल्लीत 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत 97.28 रुपये प्रति लिटर, चेन्नईत 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 92.76 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. 

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget