Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाचे दर गडगडले; Petrol Diesel लवकरच स्वस्त होणार?
Petrol Diesel Rates: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Rates Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार सुरूच आहेत. कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) दरांत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. ताज्या अपडेटनुसार, आज (मंगळवार) म्हणजेच 2 मे रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आली आहे. तसेच, WIT क्रूड प्रति बॅरल 75.71 डॉलरवर पोहोचलं आहे. एकीकडे एप्रिलमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होत असताना दुसरीकडे आता मे महिन्यात कच्च्या तेलांच्या किमतींत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. 1 मेपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol-Diesel Price) स्थिरता असून कोणताही बदल झालेला नाही.
देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे आणि अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरांत काही प्रमाणात घटही नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.
IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत SMSद्वारे चेक करा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.