(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol and Diesel Price Today: राज्यात CNG, PNG च्या दरात कपात; पेट्रोल-डिझेलचे दरही कमी होणार?
Petrol Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Price on 8th April 2023: भारतातील पेट्रोल-डिझेलची किंमत (Petrol Diesel Price) सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे ही किंमत निश्चित केली जाते. कच्च्या तेलाबद्दल (Crude Oil Price) बोलायचं झालं तर, काही काळापासून कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे, जी आजही कायम आहे. WTI क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 80.70 प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 85.12 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. या वाढीनंतरही आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत किंवा कमी झाले आहेत.
IOCL नं जारी केलेल्या आजच्या दरांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज (शनिवार) पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटरवर नोंदवलं गेलं आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात
महाराष्ट्रात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी झाल्या आहेत. मुंबईत सीएनजी 8 रुपयांनी तर पीएनजी 5 रुपयांनी स्वस्त झालाय तर पुण्यात सीएनजी 6 रुपयांनी स्वस्त झालाय. मध्यरात्री 12 पासून हे नवे दर लागू होणार आहेत. गॅसचे दर या आधी अमेरिका आणि कॅनडातील गॅसच्या दरांशी जोडले होते. मात्र आता आता हे दर कच्च्या तेलाच्या दरांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे या दरात ही घट दिसून येतेय.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत SMSद्वारे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा