एक्स्प्लोर

ITR Filing : शेवटच्या दिवशी 67 लाखांहून अधिक आयटी रिटर्न दाखल, आता दंडासह आयकर परतावा भरावा लागणार

ITR Filing : 31 जुलै रोजी रविवारी शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांनी विना दंड आयकर परतावा दाखल केला. आयकर विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

ITR Filed on 31 July : आयकर परतावा (IT Return) भरण्यासाठी 31 जुलै रोजी शेवटची मुदत होती. त्यानंतरही तुम्ही आयकर परतावा दाखल करु शकता, पण तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागेल. रविवारी शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांनी विना दंड आयकर परतावा दाखल केला. आयकर विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 31 जुलै रोजी 67 लाख 97 हजार 067 आयटी रिटर्न भरण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने ट्विट करत दिली आहे. 

आयकर विभागाने आयकर परतावा दाखल केल्याची माहिती रविवारी रात्री ट्विट दिली. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आज भरलेल्या आयकर परताव्याची आकडेवारी. आज रात्री 11 वाजेपर्यंत 67 लाख 97 हजार 67 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्या एका तासात 4 लाख 50 हजार 13 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही मदतीसाठी, कृपया orm@cpc.incometax.gov.in वर किंवा आमच्या हेल्प डेस्क नंबर 1800 103 0025 आणि 1800 419 0025 वर संपर्क साधा.
आम्हाला मदत करण्यात आनंद होईल!' 

आता दंडासह भरावा लागेल आयकर परतावा

दरम्यान, ज्यांनी 31 जुलै रोजी आयकर परतावा भरला नाही, ते अद्यापही आयटीआर दाखल करु शकतात. पण यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. आयकर परतावा भरण्यासाठी तुम्हाला 5000 हजार दंड आकारला जाईल. सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख दिली होती. आयटी रिटर्नसाठी सरकारने अद्याप तारीख वाढवलेली नाही, त्यामुळे आयकर परतावा न भरलेल्यांना दंडासह आयटी रिटर्न भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतील. वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असल्यास 5000 रुपये दंड भरावा लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Alliance Talks : 'Congress ला कोणताही प्रस्ताव दिला नाही' - MNS नेते संदीप देशपांडे
Pune Politics: 'माझ्यावर MCOCA लावण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कट', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Maharashtra Politics: 'मंत्रीपद सोडा, गट विलीन करा'; Ramdas Athawale यांच्या ऑफरवर Prakash Ambedkar यांच्या VBAचं थेट उत्तर
Pawar Politics: 'अजित पवारांना माझी भूमिका माहित आहे', Chhagan Bhujbal यांचे वक्तव्य, NCP मध्ये अंतर्गत कलह?
Ramdas Athawale on Prakash Ambedkar : आठवलेंची आंबेडकरांना साद, वंचितचा 'राजीनामा' प्रस्ताव Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
मोठी बातमी! यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
मोठी बातमी! यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
Embed widget