PPF किंवा SIP? दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यावर 15 वर्षात किती नफा होईल? समीकरण जाणून घ्या
Investment Plan PPF vs Mutual Funds SIP : PPF किंवा SIP यापैकी कोणता पर्याय उत्तम आहे? जर दोन्ही योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर त्यापैकी कोणत्या योजनेत किती पैसे मिळतील, हे वाचा.
Investment Plan : सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. पीपीएफ (PPF), म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Funds SIP) यासारखे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. पीपीएफ (PPF) ही एक सरकारी हमी योजना आहे, ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते. पीपीएफ 15 वर्षांनी मॅच्युअर होते. तर एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, ज्यामध्ये परताव्याची हमी नाही, पण अधिक नफा मिळवण्याची संधी आहे. PPF किंवा SIP कुठे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला अधिक फायदा मिळेल, हे समीकरण जाणून घ्या.
PPF किंवा SIP?
अनेकांना खात्रीशीर परतावा मिळतो अशा योजनांमध्ये पैसे गुंतवणे आवडते आणि ज्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहते. तर, काही लोक थोडीशी जोखीम पत्करून अधिक नफा मिळवण्याला प्राधान्य देतात.. पीपीएफ आणि म्युच्युअल फंड एसआयपी या दोन्ही अशा योजना आहेत.
PPF किंवा SIP यापैकी कोणता पर्याय उत्तम आहे? जर दोन्ही योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर त्यापैकी कोणत्या योजनेत किती पैसे मिळतील, कोणत्या योजनेत अधिक फायदा होईल, हे वाचा.
PPF मध्ये सध्या 7.1 टक्के व्याज
पीपीएफ ही एक सरकारी हमी योजना आहे, ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते. ही सरकारी हमी योजना सध्या 7.1 टक्के व्याजासह परतावा देत आहे. या योजनेत तुम्ही दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्ही वार्षिक 60,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये, तुम्ही 15 वर्षांत एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के परताव्यानुसार, तुम्हाला 7,27,284 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवरील व्याजासह एकूण 16,27,284 रुपये मिळतील.
एसआयपीमध्ये जास्त नफा मिळवण्याची संधी
या उलट, एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, ज्यामध्ये परताव्याची हमी नाही, पण अधिक नफा मिळवण्याची संधी असते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही कालावधीसाठी SIP सुरु करु शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यातून पैसे काढूही शकता. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे तज्ज्ञांच्या मते, SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक जास्त फायदेशीर मानली जाते. म्युच्युअल फंड SIP शेअर मार्केटशी संबंधित असल्यामुळे ही गुंतवणूक थोडी जोखमीची आहे, पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते, एसआयपी गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्के व्याज मिळते. कधीकधी यापेक्षाही जास्तही व्याज मिळू शकते.
जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा 5000 रुपये गुंतवले तर तुम्ही त्यात वार्षिक 60,000 रुपये गुंतवाल आणि 15 वर्षात तुम्ही एकूण 9,00,000 रुपये गुंतवाल. यामध्ये 12 टक्के सरासरी परताव्यानुसार समीकरण पाहिलं तर, तुम्हाला 16,22,880 रुपये फक्त व्याज मिळेल. म्हणजे, तुम्हाला पीपीएफमध्ये मॅच्युरिटीवर जितकी रक्कम मिळेल, तितकीच रक्कम तुम्हाला SIP मधून फक्त व्याजातून मिळू शकते. यामुळे, 15 वर्षांनंतर तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह एकूण 25,22,880 रुपये मिळतील. जर परतावा 12 टक्क्यांपेक्षा चांगला असेल तर ही रक्कम यापेक्षा जास्त वाढू शकते.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :