Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेचे अनेक फायदे, एकदा करा गुंतवणूक महिन्याला मिळेल परतावा
Utility News In Marathi : देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसमार्फत अनेक बचत योजना राबवल्या जातात.
Post Office Schemes : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Mis Schemes) ही एक उत्तम बचत आणि सुरक्षित योजना आहे. या योजनेत महिन्यातून एकदाच पैसे जमा करून हमखास उत्पन्न मिळवता येते. त्यामुळेच देशभरात अनेकांनी पोस्टामध्ये गुंतवणूक केली आहे. देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसमार्फत अनेक बचत योजना राबवल्या जातात. यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. जर तुम्ही निवृत्तीनंतरचा विचार करत असाल तर मासिक इनकम योजनामध्ये (Monthly Income Scheme) गुंतवणूक करु शकतात. ही एक मासिक बचत योजना आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतर तुम्हाला प्रतिमहिना ठरावीक रक्कम मिळते. (Utility News In Marathi)
सुरक्षित गुंतवणूक -
पोस्ट ऑफिसमधील मासिक इनकम योजना एकप्रकारची पेन्शन योजना आहे. यामध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरुपात मिळतील. समजा तुम्ही निवृत्त झालात. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशातील एक भाग तुम्ही वरील योजनेत गुंतवलात..तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शनप्रमाणे रक्कम मिळेल. त्यासोबतच तुम्ही गुंतवलेली रक्कमही सुरक्षित असेल.
किती मिळते व्याज ?
पोस्ट ऑफिसची मासिक इनकम योजना पाच वर्षांसाठी आहे. जर तुम्हाला हवं असेल तर पाच पाच वर्षांसाठी ही योजनेचा कालावधी तुम्ही वाढवू शकतात. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुंतवणूक केलेली रक्कम माघारी मिळेल. मासिक इनकम योजनेवर 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते. ही योजना पाच वर्षानंतर मॅच्युर होते, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. या योजनेमध्ये जास्तित जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेअंतर्गत जॉईंट खातेही उघडता येतं, अशावेळी 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकतात. 1000 रुपये भरुन तुम्ही या योजनेचं खाते उघडू शकतात.
महिन्याला पाच हजार रुपयांची कमाई -
जर तुम्ही या योजनेअंतर्गत 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर.... 6.6 टक्के वार्षिक व्याजानुसार पाच वर्षांत तुम्हाला 29 हजार 700 रुपये मिळतील. ही रक्कम तुम्ही महिन्यालाही घेऊ शकतात. महिन्याला तुम्हाला दोन हजार 475 रुपये मिळतील. जर जॉईंट खात्यामध्ये नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांत व्याजाची रक्कम 59 हजार 400 मिळेल. मासिक तत्वावर ही रक्कम हवी असल्यास तुम्हाला महिन्याला 4950 रुपये व्याज म्हणून मिळतील.
कशी कराल गुंतवणूक -
या योजनेत गुंतवणूक केली तर... वर्षाच्या आधी रक्कम काढता येत नाही.. त्याशिवाय योजना मॅच्युर होण्यापूर्वी तुम्ही रक्कम काढली तर गुंतवणूक केलेल्या रक्कममधून एक टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाईल. जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या मासिक इनकम योजनेत गुंतवणूक करायची असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणं गरजेचं आहे. 18 वर्षांवरील कोणताही व्यक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतो.