PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त 'या' शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये
PM Kisan Samman Nidhi Yojana : सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) ही करणं बंधनकारक आहे.
PM Kisan Scheme 16th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशाप्रकारे घेत आहेत, याची माहिती शासनाला मिळू शकलेली नाही. यामुळेच सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) ही करणं बंधनकारक आहे. या दोन्ही गोष्टी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हे शेतकरी 6000 रुपये लाभापासून वंचित राहतील.
पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट!
पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेतील फसवणूक (Fraud) टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी किंवा एनपीसीआय आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ही मोहीम किसान क्रेडिट कार्ड (KCC) खातेधारक नसलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेशी जोडण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सर्व कृषी समन्वयक आणि शेतकरी सल्लागारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता फक्त 'या' शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) शासनाकडून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ लाभार्थी पात्र शेतकरी कसा घेत आहेत, याची माहिती शासनाला मिळत नाही. या परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) नाही, अशा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला जाईल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्जही दिलं जाईल.
पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्याची प्रतीक्षा
पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत शेतकरी पुढील हफ्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी किंवा एएनपीसीआय केलेले नाही, त्यांनी हे काम लवकरात लवकर करुन घ्या. ई-केवायसी किंवा एएनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळणार नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bharat Rice : स्वस्त डाळीनंतर, आता स्वस्त तांदूळ! फक्त 29 रुपये किलोने मिळणार 'भारत तांदूळ'