EPFO वर व्याजदर घटल्यानंतर कर्मचाऱ्यांना होणार 'इतकं' नुकसान; जाणून घ्या संपूर्ण गणित
Provident Fund : केंद्र सरकारने PF वरील व्याजदरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल सहा कोटी कर्मचाऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.
नवी दिल्ली: EPFO म्हणजेच एम्पॉलमेंट प्रॉव्हिडंट ऑर्गनायझेशनने शनिवारी पीएफवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने आर्थिक वर्ष 2022 साठी व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पीएफ खात्यावर व्याज घेणाऱ्या ईपीएफओ सदस्यांना आता कमी व्याज मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका हा देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. हा व्याजदर गेल्या 40 वर्षातील सर्वात कमी आहे.
एकीकडे सर्वसामान्यांना महागाईला सामोरं जावं लागत असून दुसरीकडे आता त्यांच्या पीएफवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. सन 1977-87 पासून पाहिलं तर या वर्षी सर्वांत कमी व्याजदर देण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 1977-78 नंतर ईपीएफवर सर्वात कमी व्याजदर ठेवले आहेत. 1977-78 मध्ये भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आला होता. या व्याजदरात कपात केल्यानंतर सर्वसामान्यांना त्यांच्या पीएफवर कमी व्याज मिळणार आहे.
तुम्हाला किती नुकसान होणार?
एका कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीतून 12 टक्के हिस्सा हा त्याच्या पीएफ खात्यात जमा होतो. हा हिस्सा त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो. कंपनीच्या 12 टक्के योगदानातील 3.67 टक्के रक्कम ही कर्मचाऱ्याच्या पेंशन खात्यात जाते. उरलेली 8.33 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जाते.
असं आहे पूर्ण गणित...
बेसिक पगार = 15,000 रुपये
- EPF मध्ये कर्मचाऱ्याचं योगदान= 15,000 च्या 12 टक्के = 1,800 रुपये
- EPF मध्ये कंपनी चे योगदान = 15,000 च्या 8.33 टक्के =1,250 रुपये
- EPF मध्ये कंपनी चे योगदान= 1,800 रुपये-1,250 रुपये = 550 रुपये
- प्रत्येक महिन्यातील ईएफपीओमधील योगदान = 1,800 + 550 = 2,350 रुपये
2021-22 सालासाठी व्याजदर हा 8.10 टक्के आहे. या हिशोबाने प्रत्येक महिन्यातील व्याजदर हे 8.10 टक्क्यासाठी 12 महिन्यांच्या तुलनेने एका महिन्याचे व्याजदर हे 0.675 टक्के इतकं आहे. जे या आधी 0.7083 टक्के मिळत होतं.
संबंधित बातम्या:
- PF Interest rate : कधी काळी EPF वर मिळायचे 12 टक्के व्याज, आता मोदी सरकारकडून व्याजदरावर कात्री
- केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा झटका, आर्थिक वर्ष-22 साठी EPFO व्याजदरात कपात; 40 वर्षात पहिल्यांदाच सर्वात कमी व्याजदर
- संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदा देणारी EPFO ची नवी पेन्शन योजना