एक्स्प्लोर

संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदा देणारी EPFO ची नवी पेन्शन योजना

New Pension Scheme : ईपीएफओने 2014 मध्ये मासिक पेन्शनपात्र मूळ वेतन 15,000 रुपयांपर्यंत मर्यादित करण्यासाठी योजनेत सुधारणा केली होती.

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याचा विचार करत आहे. ही नवीन योजना संघटित क्षेत्रातील अशा कर्मचार्‍यांसाठी असेल, ज्यांचे मूळ वेतन  15,000 रु. पेक्षा जास्त आहे आणि जे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना-1995 (EPS-95) अंतर्गत अनिवार्यपणे समाविष्ट नाहीत. सध्या  संघटित क्षेत्रातील ते कर्मचारी ज्यांचे मूळ वेतन (मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता) रुपये 15,000 पर्यंत आहे ते अनिवार्यपणे EPS-95 अंतर्गत येतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "ईपीएफओच्या सदस्यांमध्ये जास्त योगदानावर अधिक पेन्शनची मागणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे, ज्यांचे मासिक मूळ वेतन 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा लोकांसाठी नवीन पेन्शन योजनेचा विचार केला जात आहे.

या प्रस्तावावर मार्चमध्ये चर्चा

या नवीन पेन्शन योजनेच्या प्रस्तावावर ईपीएफओची निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) च्या 11 आणि 12 मार्च रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाईल. बैठकीदरम्यान, CBT ने नोव्हेंबर 2021 मध्ये स्थापन केलेल्या पेन्शनशी संबंधित समस्यांवर एक उपसमिती देखील आपला अहवाल सादर करेल. सूत्रांनी सांगितले की, असे ईपीएफओ सदस्य आहेत ज्यांना 15,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन मिळत आहे, परंतु ते EPS-95 अंतर्गत केवळ 8.33 टक्के कमी दराने योगदान देऊ शकतात, त्यामुळे त्यांना कमी पेन्शन मिळते.

EPS-95 च्या कक्षेत आणखी 50 लाख कर्मचारी

अंदाजानुसार, पेन्शनपात्र पगार वाढवून संघटित क्षेत्रातील आणखी 50 लाख कामगार EPS-95 च्या कक्षेत येऊ शकतात. ईपीएफओने 2014 मध्ये मासिक पेन्शनपात्र मूळ वेतन 15,000 रुपयांपर्यंत मर्यादित करण्यासाठी योजनेत सुधारणा केली होती. 15,000 रुपयांची मर्यादा सेवेत सामील होताना लागू होते. संघटित क्षेत्रातील वेतन सुधारणा आणि किंमती वाढीमुळे 1 सप्टेंबर 2014 पासून ते 6,500  रुपयावरून सुधारित करण्यात आले. नंतर मासिक मूळ वेतन मर्यादा 25 हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यावर विचारही झाला, मात्र प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या :

EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ​​ची 'ही' सुविधा, जाणून घ्या

EPFO विभागाचा पीएफ खातेदारांना मोठा दिलासा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

EPFO News : 23.34 कोटी ईपीएफओ खातेधारकांसाठी खुशखबर; सरकारकडून 2020-21 वर्षाचं व्याज जमा

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget