(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FD Rates : SFB कडून फक्त 3 वर्षांच्या FD वर 8.60 टक्के व्याज, भरघोस फायदा मिळवण्याची संधी
FD Interest Rates : स्मॉल फायनान्स बँकांकडून (SFB) फक्त 3 वर्षांच्या FD वर ग्राहकांना 8.60 टक्के व्याज देत आहेत. याची संपूर्ण यादी पाहा.
SFB FD Interest Rates : देशातील अनेक मोठ्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Bank) तुलनेत, लहान वित्त बँका (Small Finance Banks) मुदत ठेव (Fixed Deposit) योजनांवर ग्राहकांना जास्त व्याज दर (Interest Rate) देत आहेत. अनेक गुंतवणुकीचे पर्याय (Investment Plan) उपलब्ध आहेत. पण, लोक अजूनही एफडी योजनांमध्ये (Best FD Investment Plan) पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. बँकांकडून एफडीवर चांगला व्याज दर (FD Interest Rate) देण्यात येतो. अनेक छोट्या बँकांकडून मुदत ठेववर चांगला व्याज दर देण्यात येत आहे. छोट्या बँका इतर बँकांच्या तुलनेत केवळ तीन वर्षांच्या कालावधीत ग्राहकांना जास्त व्याजदराचा लाभ देत आहेत. बँकबाजारने या संदर्भात माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे स्मॉल फायनान्स बँकांकडून (SFB) एफडीवर किती व्याज देण्यात येत आहे, हे जाणून घ्या.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.60 टक्के व्याजदर देत आहे. तुम्ही एकूण तीन वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1.29 लाख रुपये मिळतील. त्यामुळे हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
आणखी एका स्मॉल फायनान्स बँकेकडून तुम्हाला 8.50 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याजदर देत आहेत. त्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.29 लाख रुपयांचा परतावा मिळेल.
फिनकेअरकडून 8.11 टक्के व्याज
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) तीन वर्षांच्या FD वर 8.11 टक्के व्याज देत आहे. यामुळेळ 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन वर्षांनंतर तुम्हाला 1.27 लाख रुपयांचा परतावा मिळेल.
AU स्मॉल फायनान्स बँकेकडून 8 टक्के व्याज
AU स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) ग्राहकांना तीन वर्षांच्या मुदत ठेव (FD) वर 8 टक्के व्याजदर देत आहे. त्यामुळे AU स्मॉल फायनान्स बँकेत तुम्ही तीन वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 1.27 लाख रुपयांचा परतावा मिळेल.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
तीन वर्षांच्या FD वर नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक (North East Small Finance Bank) तुम्हाला 7.75 टक्के व्याजदर देत आहे. येथे तुम्ही 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर तुम्हाला तीन वर्षांनी 1.26 लाख रुपये मिळतील.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. ही माहिती गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)