Paytm : गणेश चतुर्थीनिमित्त पेटीएमच्या ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा, 9 सप्टेंबरपर्यंत विमान, रेल्वे आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती
Paytm Travel Carnival Sale : ट्रॅव्हल कार्निवल सेल हा भारतीय प्रवाशांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या पेटीएमच्या मूल्य-आधारित प्रवास समाधानाचा एक महत्त्वाचा भाग असून त्याअंतर्गत विविध सवलती दिल्या जातात.
![Paytm : गणेश चतुर्थीनिमित्त पेटीएमच्या ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा, 9 सप्टेंबरपर्यंत विमान, रेल्वे आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती Paytm Travel Carnival Sale Ganesh Chaturthi 2024 discounts on airoplane rail bus tickets till September 9 business marathi Paytm : गणेश चतुर्थीनिमित्त पेटीएमच्या ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा, 9 सप्टेंबरपर्यंत विमान, रेल्वे आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/47ed69f069a82b1af356505e9de278dc172564252882693_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : One97 Communications Limited (OCL), पेटीएम ब्रँडचे मालक आणि भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व वित्तीय सेवा कंपनीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ट्रॅव्हल कार्निवल सेलची घोषणा केली आहे. या विशेष सेलमध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. ही ऑफर सणासुदीचा प्रवास अधिक परवडणारा आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार केले गेले आहे.
फ्लाइट बुकिंगसाठी, पेटीएमने "FLYAXIS" प्रोमो कोडचा वापर करून Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे बुकिंगवर 1,500 रुपयापर्यंत फ्लॅट 12 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी "INTLAXIS" कोडद्वारे 5,000 पर्यंत 10 टक्के सूट मिळू शकते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी क्रेडिट कार्ड EMI ऑप्शन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी "INTLAXISEMI" द्वारे 12 टक्के सूट आणि "FLYAXISEMI" द्वारे 2,000 पर्यंत किंवा 7,500 पर्यंत 10 टक्के सूट उपलब्ध आहे.
बस तिकिटांवर देखील पेटीएमने आकर्षक सवलती दिल्या आहेत. "BUSFESTIVE" प्रोमो कोडद्वारे वापरकर्त्यांना 300 पर्यंत 12 टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय, पेटीएम महिलांसाठी खास "महिला प्रवासी" बुकिंग फीचर देखील उपलब्ध करते, ज्याद्वारे महिला प्रवाशांना इतर महिला प्रवाशांच्या शिफारसीनुसार बस निवडणे सोपे होते.
पेटीएमच्या "टिकिट ॲश्युर" सेवेने वापरकर्त्यांना जवळची स्टेशन, कनेक्टिंग ट्रेन व लवचिक तारखांचा पर्याय देऊन कन्फर्म तिकीट बुक करण्याच्या शक्यता वाढतात. वापरकर्ते UPI द्वारे शून्य शुल्कावर तिकीट बुक करू शकतात, तसेच पेटीएम अॅपवर PNR स्थिती व ट्रेनची धावण्याची स्थिती देखील सहज तपासू शकतात. IRCTC चे अधिकृत भागीदार असल्याने, पेटीएम जलद आणि सोयीस्कर रेल्वे तिकीट बुकिंग अनुभव प्रदान करते.
विनामूल्य रद्दीकरण सुविधेसह, वापरकर्ते फ्लाइट, ट्रेन आणि बस तिकिटांवर 100 टक्के परतावा मिळवू शकतात. या सर्व सुविधांसह प्रवास अधिक आरामदायक व तणावमुक्त होतो.
पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही प्रवाशांना त्यांचा प्रवास परवडणारा आणि सोयीस्कर बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. ट्रॅव्हल कार्निवल सेलद्वारे आम्ही फ्लाइट, ट्रेन आणि बस बुकिंगवर अविश्वसनीय सवलती देत आहोत, ज्यामुळे प्रवाशांना गणेश चतुर्थीच्या उत्सवात त्यांचे प्रियजनांबरोबर आनंद लुटता येईल."
ट्रॅव्हल कार्निवल सेल हा भारतीय प्रवाशांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या पेटीएमच्या मूल्य-आधारित प्रवास समाधानाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)