(Source: Poll of Polls)
Paytm IPO Listing : पेटीएमच्या शेअर्सची संथ सुरुवात, गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्यासाठी पाहावी लागणार वाट
Paytm IPO Listing : देशातील सर्वात मोठा आयपीओ आणणाऱ्या पेटीएमचे (Paytm) शेअर्स अखेर बाजारात लिस्टिंग झाले आहेत.
Paytm IPO Listing : देशातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) आणणाऱ्या पेटीएमचे (Paytm) शेअर्स अखेर बाजारात लिस्ट(Listing) झाले आहेत. पेटीएमचे शेअर गुरुवारी बीएसई (BSE) आणि एनएसईमध्ये (NSE) लिस्ट झाले. पेटीएमचे शेअर एनएसईवर 1950 रुपये आणि बीएसईवर 1955 रुपये किंमतीला खुला झाला. पेटीएमचा आयपीओ त्याच्या मूळ किंमतीपेक्षा कमी लिस्ट होईल, असे संकेत आधीच मिळाले होते. त्यानुसार पेटीएमच्या शेअर लिस्टिंगवेळी आयपीओ मूळ किंमतीपेक्षा 13.61 टक्के कमी भाव मिळाला. ही घसरण पुढेही कायम राहिली नंतर पेटीएमचे शेअर 26 टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे पेटीएमचं मार्केट कॅपिटल 1.20 लाख कोटी रुपयांवर आलाय. पेटीएमच्या एका शेअर्समागे गुंतवणूकदाराला जवळपास 500 रुपयांचा तोटा झाला. पेटीएमच्या या तोट्यातील शेअर्समुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत.देशातील सर्वात मोठा आयपीएओ असल्यामुळे पेटीएमकडून गुंतवणूकदारांना मोठ्या आपेक्षा होत्या. मात्र, पेटीएमच्या शेअर्सची संथ सुरुवात झाल्यामुळे गुंतवणूकदारकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications ने आठ नोव्हेंबर रोजी नोंदणीसाठी खुला झाला होता. याची मूळ किंमत 2080- 2150 रुपये इतकी ठेण्यात आली होती. मोठ्या चर्चेनंतरही पेटीएमचा आयपीओ 1.89 पटीने सब्सक्राइब झाला होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुंबई शेअर बाजारात पेटीएमचे शेअर्स लिस्टिंग झाले. यासाठी मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला पेटीएमचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा आणि मुख्य वित्तीय आधिकारी मधुर देवरा उपस्थित होते. पण सुरुवातीपासून पेटीएमच्या शेअर्सनं संथ सुरुवात केली. पेटीएम शेअर्सची शेअर बाजारातील अवस्था पाहून विजय शेखर शर्मा यांना अश्रू रोखता आलं नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विजय शेखर शर्मा यांना शेअर्समार्केटमध्ये मोठी सुरुवात मिळाले अशी आपेक्षा होती, मात्र सुरुवात अतिशय संथ झाली.
पेटीएमने आपल्या समभाग विक्री योजनेतून 18300 कोटी रुपयांचे शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले होते. कंपनीचे बाजार मूल्य 1.39 लाख कोटी इतके आहे. ज्याची सबस्क्रिप्शन प्राईज 2080- 2150 रुपये इतकी आहे. पेटीएमचा आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. जवळपास 1.8 पटीने पेटीएमचा आयपीओ सबस्क्राईब झाला होता. आतापर्यंतचा शेअर बाजारातला हा सर्वात मोठा आयपीओ ठरला होता. मात्र, पेटीएमची शेअर बाजारातील एन्ट्री संथ झाली आहे.
फंड व्यवसाय विस्तार -
पेटीएम नवीन व्यापारी आणि ग्राहक जोडण्यासाठी नवीन इश्यूमधून जमा केलेला निधी वापरण्याची योजना आखत आहे. मूल्यमापनावर गुंतवणूकदारांच्या मत भिन्नतेमुळे पेटीएमने IPOपूर्व निधी उभारला नाही. पेटीएमच्या मुद्द्याबाबत, आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, दररोज नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे पेमेंट मार्केटमधील स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. जर पेटीएम व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली नाही, तर त्याचा त्याच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल. कंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत पेमेंट सेवा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यातील जोखीम आणि फायदे समजून घेऊन गुंतवणूक करावी.