एक्स्प्लोर

Paytm Payments Bank : नेमकं कुठे चुकलं माहिती नाही, पण एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही; पेटीएमच्या सीईओंचे आश्वासन

Paytm Payments Bank : पेटीएमचे कर्मचारी हे आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहेत, त्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीत असं आश्वासन कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दिलं आहे. 

Vijay Shekhar Sharma : आरबीआयने (RBI) पेटीएम बँकेवर (Paytm Payments Bank) केलेल्या कारवाईनंतर पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचं नेमकं कुठे चुकलं हेच समजत नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेवर एवढी मोठी कारवाई कशी केली हेच समजत नाही असं विजय शेखर शर्मा म्हणाले. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत एक मिटिंग घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

विजय शेखर शर्मा यांनी कॉन्फरन्स कॉल दरम्यान बोलताना कर्मचाऱ्यांनी त्यांनी नोकऱ्यांबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही असा विश्वास दिला. तुम्ही सर्व पेटीएम कुटुंबाचा भाग आहात, कंपनी तुमची काळजी घेईल असं ते म्हणाले. विजय शेखर शर्मा व्यतिरिक्त, पेटीएमचे अध्यक्ष आणि सीओओ भावेश गुप्ता, पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ सुरिंदर चावला यांच्यासह सुमारे 900 कर्मचारी या कॉलमध्ये सामील होते.

सेवा सुरू ठेवण्यासाठी अनेक बँकांशी संपर्क साधला

मनी कंट्रोलच्या एका वृत्तानुसार, विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, पेटीएम बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी कंपनीने अनेक बँकांशी संपर्क साधला आहे. पेटीएम सर्व नियमांचे पालन करेल.

विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. कारण पेटीएमसंबंधित एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. कंपनीच्या भवितव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

कंपनीचे शेअर्स आणखी 10 टक्क्यांनी घसरले

पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. स्टॉक एक्स्चेंजमध्ये लोअर सर्किट 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आले होते. सोमवारी ते आणखी 10 टक्क्यांनी घसरून 438.35 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप देखील 27,838.75 कोटी रुपयांवर घसरले आहे. पेटीएमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दावा केला होता की त्यांचे ॲप 29 फेब्रुवारीनंतरही काम करत राहील. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांचे कामकाज बंद करण्यासाठी 29 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.

फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याची चौकशी होणार

रॉयटर्सने दोन वरिष्ठ सरकारी सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, अंमलबजावणी संचालनालय (ED) पेटीएमसह वन 97 कम्युनिकेशन्सद्वारे संचालित प्लॅटफॉर्मची चौकशी करत आहे. या प्रकरणात परकीय चलन नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले का, याचा शोध ईडी घेत आहे. फेमाच्या नेमक्या कोणत्या तरतुदीनुसार तपास केला जात आहे हे सूत्रांनी सांगितले नाही. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget