भारतीय बँकिंगला नवी दिशा मिळणार, पतंजलीकडून 360° ERP सिस्टीम लाँच, जाणून घ्या सविस्तर माहिती
Banking News: पतंजलीनं म्हटलं की आयटीच्या ERP, DSM, HIMS यानंतर बँकिंगसाठी भरुवा सोल्यूशन्सचं CBS सॉफ्टवेअर महत्त्वाची भूमिका बजावेल. याला डिजीटल बँकिंगमध्ये क्रांती आणण्यासाठी डिझाईन केलंय.

Patanjali ERP System News: पतंजली ग्रुपनं भारतीय बँकिंग क्षेत्रात आपल्या रणनीतीक प्रवेशाची घोषणा केली आहे. पतंजलीच्या टेक्नोलॉजी ब्रँच असलेल्या भरुवा सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड नं AI आधारित, बहुभाषिक 360° बँकिंग ERP सिस्टीम लाँच केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा नेक्स्ट जेनचा प्लॅटफॉर्म प्रादेशिक, सहकारी आणि छोट्या वित्तीय संस्थांना बुद्धिमता, समावेशन आणि तंत्रज्ञानासह सशक्त करुन डिजीटल बँकिंग क्षेत्रात क्रांती करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे.
पतंजली म्हटलं की, भरुवाचा अत्याधुनिक CBS प्लॅटफॉर्म (बी-बँकिंग) चार महत्त्वपूर्ण आव्हानांवर मार्ग शोधण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आला आहे. भारताच्या बँकिंग यंत्रणेतील नावीन्यता आणि समावेशकतेमध्ये अडसर ठरणाऱ्या गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी बनवण्यात आली आहे.
1. भाषा समावेशन - भारतात अनेक भाषा असल्या तरी अधिकतर बँकिंग सेवा इंग्रजीत मर्यादित आहेत. BSPL कडून दोन भाषा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामध्ये इंग्रजी आणि स्थानिक भाषा अशा दोन भाषा ग्राहकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध करुन दिल्यात जातील. उदा. गुजरातमध्ये इंग्रजीसह गुजरात आणि पंजाबमध्ये इंग्रजीस पंजाबी, याचा फायदा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यश येईल.
2. अधिक सुरक्षा
प्लॅटफॉर्मध्ये डेटा, रोख व्यवहार, डिजिटल इंटरअॅक्शन साठी व्यापक सुरक्षा देण्यासाठी अत्याधुनिक एआय आणि सायबर सुरक्षा प्रोटोकॉलचा समावेश आहे.
3. प्रक्रिया दक्षता
या बँकिंग सिस्टीममध्ये एंड-टू- एंड बँकिंग परिवर्तनासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. सिस्टिममध्ये एपीआय बँकिंग, एमआयएस, एचआरएस, ईआरपी मॉड्यूल, एएमएल टूल आणि अडथळा विरहित संचालनासह वर्कफ्लो ऑटोमेशनसह मजबूत क्षमता आहे.
4. नियाकांच्या नियमांचं पालन
अधिकृत भाषा अधिनियम 1963 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पूर्णपणे पालन करण्यात आलं आहे. वित्तीय संस्थांमध्ये दोन भाषांमधील सॉफ्टवेअर सरकारी आदेशांचं पालन सुनिश्चित करतं.
पतंजली समुहाचे संस्थापक आचार्य बाळकृष्ण यांनी तंत्रज्ञानाच्या समावेशनासंदर्भातील कटिबद्धता व्यक्त म्हटलं की , भारत अनेक भाषांचा देश आहे, आपल्या बँकिंगची यंत्रणा प्रामुख्यानं इंग्रजीतून चालवली जाते. यामुळं बहुसंख्य लोक बाजूला पडतात. भरुवा सोल्यशन एक परिवर्तनशील सेवा लाँच करत आहे. जी तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं चांगली, व्यापक आणि भाषिक रुपानं समावेशक आहे. जी अधिकृत भाषा अधिनियम 1963 चं पालन करते.
भारताला सशक्त करण्याच्या दिशेनं ठोस पाऊल : बाळकृष्ण
एआय आणि मशीन लर्निंगच्या या युगात हीच वेळ आहे की आपल्या ग्रामीण , निम शहरी, सहकारी आणि छोट्या वित्तीय संस्थांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांप्रमाणं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. हे पाऊल भारताला प्रत्येक गोष्टीत सशक्त करण्याच्या दिशेनं टाकलेलं आहे. या व्हिजनला साकार करण्यासाठी भरुवा सोल्यूशन्सनं नॅच्युरल सपोर्ट कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. जो दोन भाषांच्या बँकिंगमधील अनुभवी कंपनी आहे. ज्यांनी 1999 पासून एएलएम, एलओएस, एमआयस सारख्या सराऊंड उत्पादनांसाठी 5000 पेक्षा अधिक बँक शाखांना सेवा पुरवलीय.
काय आहे BSPL चं धोरण
पतंजलीनं काय म्हटलं, ''भरुवा आणि नॅच्युरल सपोर्ट कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेडचं एक व्यापक ध्येय असून जे एक ऑल-इन-वन-प्लॅटफॉर्मसह फ्रंटएंड उत्कृष्टतेला एक शक्तिशाली बँकएंड इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडते. हे कोअर बँकिंग सिस्टीमशी सहज संलग्नित होतं आणि इंटरनेट, मोबाईल बँकिंग, एआय संचलित शोध, ई केवायसी, सीकेवायसी, पीएफएमएस एकीकरण, एसएमएस बँकिंग, केसीसी बँकिंग, एएमल, एचआरएमस, सीएसएस, एमआयस, डीएसएस आणि ईआरपी, एचआरएमस सारख्या बँकएंड प्रक्रिया सारख्या सेवांसह आहे.
याचा फायदा राज्य सरकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकिंग, शहरातील सहकारी बँका आणि एनबीएफसी याच्यासह भारतातील इतर वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष विविध भाषी बँकिंगच्या क्षेत्रात डिजीटल परिवर्तनाला सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.























