निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
कांद्यावरील निर्यातबंदी (onion export) संपून आज 10 दिवस उलटले आहेत. तरीदेखील कांद्याच्या दरात वाढ (Onion Price) झाली नाही. नेमकी दरात का वाढ झाली नाही? याबाबतची माहिती पाहुयात.
![निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय? onion price News Even if onion export ban is lifted there is no increase in onion prices निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/3dc60b93fb39cf524a7de5f2386456581715586180902339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Onion Price News : सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडलाय. कारण कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. कांद्यावरील निर्यातबंदी (onion export) संपून आज 10 दिवस उलटले आहेत. तरीदेखील कांद्याच्या दरात वाढ (Onion Price) झाली नाही. नेमकी दरात का वाढ झाली नाही? याबाबतची माहिती खुद्द शेतकऱ्यांनी दिलीय. शेतकरी नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात?
निर्यातबंदी हटवून 10 दिवस झाले तरीही दर वाढले नाहीत
केंद्र सरकारनं गेल्या पाच महिन्यापूर्वी म्हणजे 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी 31 मार्चपर्यंत असेल असं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, मार्चमध्ये ही बंदी उठवली नाही. अखेर 3 मे रोजी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. आज निर्यातबंदी हटवून जवळपास 10 दिवस झाले तरीही देखील कांद्याचे दर जैसे थे आहेत. दरात नेमकी वाढ का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अटी शर्तीमुळं कांद्याच्या दरात वाढ नाही
दरम्यान, सरकारने निर्यातबंदी उठवली असली तरी बाजारात भाव वाढत नाहीत कारण, सरकारनं निर्यातबंदी हटवताना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे कांद्याची निर्यात होत नाही. याचा परिणाम दरांवर होत आहे. सरकारने कांद्यावर किमान निर्यात किंमत 550 डॉलर प्रति टन निर्धारित केले आहे. त्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारले आहे. इतका महाग कांदा कोण घेणार? त्यामुळं निर्यातबंदी हटवून देखील दरात वाढ होत नाही.
बाजारांमध्ये कांद्याचा किमान भाव 1,2,3 आणि 4 रुपये प्रति किलो
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतेक बाजारांमध्ये कांद्याचा किमान भाव अजूनही 1,2,3 आणि 4 रुपये प्रति किलो आहे. तर सरासरी भाव हा 13 ते 15 रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे कमाल किंमत 18 रुपये ते 25 रुपये आहे. पाच महिन्यांपासून कांदा निर्यातबंदी उठवूनही मंडईतील शेतमालाला भाव वाढला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने निर्यातबंदी उठवली असली तरी बाजारात भाव वाढत नाहीत अशा काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे कांद्याची निर्यात होत नाही. परिणामी दरात घसरण झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलीय.
कोणत्या बाजारात कांद्याला किती दर?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मंचर मंडईत कांद्याचा किमान भाव केवळ ३ रुपये प्रतिकिलो, राहाता बाजारात 2 रुपये किलो होता. तसेच जुन्नर-नारायणगाव येथे किलोला चार रुपये दर मिळत आहे. तर सोलापूरच्या बाजारात कांद्याचा भाव केवळ 1 ते 2 रुपये किलो होता. सध्या मिळणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या:
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)