(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दसरा-दिवाळी ते नवरात्र, ऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती!
ऑक्टोबर महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद असणार आहेत. या महिन्यात दसरा, दिवाळी हे मोठे सण आहेत.
मुंबई : सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल. म्हणूनच आता अनेकजण पुढच्या महिन्यात करावयाच्या कामांची यादी करत असतील. यात बँकेशी संबंधित काही कामे असतील तर अगोदर बँकांना सुट्टी नेमकी कधी आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे. पुढील महिन्यात बँकांन असणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही कामाचे नियोजन आखायला हवे. पुढील महिन्यात दसरा, दिवाळी, नवरात्री असे अनेक महत्त्वाचे सण असल्यामुळे या महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तब्बल कोणत्या दिवशी बँका बंद असतील, हे जाणून घेऊ या...
एकूण 15 दिवस बँका बंद राहणार
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून संबंधित महिन्यात बँकेला किती सुट्ट्या असतील हे जाहीर केल जाते. याच यादीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बँकांना एकूण 15 दिवस सुट्ट्या असतील. यामध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी असणारी सुट्टी तसेच वेगवेगळ्या सणांनिमित्त असणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद असणार आहेत, मात्र या सुट्ट्या काही राज्यांना लागू असतील तर काही राज्यांना त्या लागू नसतील. म्हणजेच स्थानिक सण, उत्सवाला लक्षात घेऊन आरबीआयने या सुट्ट्या दिलेल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे तेथिल बँका एक दिवस बंद असतील. गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा, लक्ष्मीपूजन, काटी बहू, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका बंद असतील?
1 ऑक्टोबर - विधानसभा निवडणुकीमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद असतील.
2 ऑक्टोबर- महात्मा गांधी यांच्या जयंतीमुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील.
3 ऑक्टोबर- नवरात्रीमुळे जयपूरमध्ये बँका बंद असतील.
6 ऑक्टोबर- रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
10 ऑक्टोबर- दुर्गा पूजा, दसर, महासप्तमी यामुळे अगरताळा, गुवाहाटी, कोलकाता, कोहिमा येथील बँका बंद असतील.
11 ऑक्टोबर- दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा, दुर्गा अष्टमी, यामुळे अगरताळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फआळ, ईटानगर, कोहिमान, कोलकाता, पाटणा, रांची, शिलाँग या भागात बँका बंद असतील.
12 ऑक्टोबर- विजयदशमी, दुर्गा पूजा यामुळे पू४ण देशात बँका बंद असतील.
13 ऑक्टोबर- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील.
14 ऑक्टोबर- दुर्गा पूजेमुळे गंगटोक येथील बँका बंद असतील.
16 ऑक्टोबर- लक्ष्मी पूजामुळे अगरताळा कोलकाता येथे बँका बंद असतील.
17 ऑक्टोबर- महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त बंगळुरू, गुवाहाटी येथे बँका बंद असतील.
20 ऑक्टोबर- रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
26 ऑक्टोबर- चौथा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
27 ऑक्टोबर- रविवार अशल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
31 ऑक्टोबर- दिवाळीनिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद असतील.
दरम्यान, या काळात बँका बंद असल्या तरी नेटबँकिंग आणि फोन बँकिंग चालू राहील.
हेही वाचा :
पत्नी हाऊसवाईफ असेल तर होईल मोठा फायदा, 'या' योजनेत वाचतील हजारो रुपये!
पीएफ काढताना फक्त 'या' चार गोष्टी करा, कधीच क्लेम रिजेक्ट होणार नाही!