देशात वर्षाला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांची संख्या किती? केंद्र सरकारनं दिली सविस्तर माहिती
देशात आयकर संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात 2.16 लाख असे करदाते (Taxpayers Data) आहेत की, जे वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावत आहेत.
Taxpayers Data: देशात आयकर संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात 2.16 लाख असे करदाते (Taxpayers Data) आहेत की, जे वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावत आहेत. याबाबतची माहिती खुद्द अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister Pankaj Chaudhary) यांनी यांनी संसदेत दिली. 2019 पासून यामध्ये लक्षणीय वाढी होत आहे. उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांमध्ये सकारात्मक कल दिसून येत आहे. आयकर रिटर्न फाइलिंग डेटावरुन हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
वैयक्तिक आयकर संकलनात दरवर्षी 27.6 टक्के वाढ
वैयक्तिक आयकर संकलनात दरवर्षी 27.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याचे श्रेय कर सुधारणा आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या चांगल्या गतीला दिले आहे. याशिवाय 'प्रोफेशनल इन्कम रिपोर्टिंग'मध्येही वाढ झाल्याचे संसदेत सांगितले. दरवर्षी 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सांगितले की, 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही संख्या 2.16 लाखांहून अधिक झाली आहे.
देशात आयकर रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यापैकी 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्याही वेगाने वाढली आहे. 2019-20 च्या मूल्यांकन वर्षात हा आकडा 1.09 लाख कोटी रुपये होता, तर 2022-23 च्या मूल्यांकन वर्षात तो 1.87 लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे.
53 लाख करदात्यांनी भरला प्रथमच आयकर रिटर्न
26 ऑक्टोबर 2023 च्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 7.41 कोटी करदात्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरले आहेत. त्यापैकी 53 लाख करदाते आहेत ज्यांनी प्रथमच आयकर रिटर्न भरले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने डेटा जारी केला आहे, ज्यानुसार 2013-14 मूल्यांकन वर्षात उत्पन्न रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची संख्या 3.36 कोटी होती, जी 2021-22 च्या मूल्यांकन वर्षात 90 टक्क्यांनी वाढून 6.37 कोटी झाली आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या 8.18 कोटी झाली होती. जी मागील मूल्यांकन वर्षात 7.51 कोटी होती. 2023-24 च्या मूल्यांकन वर्षात 9 टक्के अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. आयकर विभागाने करदात्यांना AIS आणि TIS ची सुविधा सुरू केल्यानंतर करदात्यांची संख्या वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या: