NTPC Green Energy IPO: एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओबद्दल मोठी अपडेट, एका शेअरची किंमत किती असणार, पुढील आठवड्यात IPO येणार
NTPC Green Energy IPO: एनटीपीसी ग्रीन एनर्जीनं त्यांच्या आयपीओच्या एका शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा अधिक ठेवण्यासाठी सल्लागारांसोबत चर्चा सुरु केल्या आहेत.
NTPC Green Energy IPO मुंबई: एनटीपीसी (NTPC)च्या ग्रीन एनर्जीशी संबंधित उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (NTPC Green Energy Limited) चा आयपीओद्वारे 12 अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन मिळवण्याचा प्रयत्न आहे. 12 अब्ज डॉलर्स बाजारमूल्य मिळवण्यासाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचे प्रयत्न सुरु आहेत. याचा विचार करुन एका शेअरची किंमत निश्चित केली जाऊ शकते. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा आयपीओ नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड त्यांच्या आयपीओच्या एका शेअरची इश्यू प्राइस 100 रुपयांपेक्षा अधिक ठेवण्याची तयारी करत आहे. या आयपीओच्या माध्यमातून बाजारातून 10 हजार कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कंपनीचा आयपीओ 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान सबस्क्राइब करण्यासाठी खुला असेल. कंपनीनं अद्याप आयपीओचं प्राईस बँड निश्चित केलेलं नाही. याबाबत अजूनही चर्चा सुरु आहेत. एका शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये असेल. एनटीपीसी ग्रीन एनर्जीकडून दर्शनी किंमत, फ्लोअर प्राइस, कॅप प्राइस आणि इश्यू प्राईस बुक रनिंग लीड मॅनेजर सोबत चर्चा करुन ठरवलं जाईल.
सेबीनं ऑक्टोबर महिन्यात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या आयपीओला मंजुरी देण्यात आली होती. कंपनीनं सप्टेंबर 2024 मध्ये सेबीकडे आयपीओ आणण्यासाठी डीआरएपची सादर केलं होतं. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीच उपकंपनी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओद्वारे नव्यान शेअर्स जारी केले जातील. यामध्ये प्रमोटर्सची कोणतीही भागिदारी नसेल.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी 10,000 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून जमा करेल त्यापैकी 7500 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. उर्वरित रक्कम कंपनीच्या कॉर्पोरेट उद्देशासाठी आणि विस्तारासाठी खर्च केला जाईल. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आयपीओमध्ये काही शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवेल. कर्मचाऱ्यांना आयपीओ इश्यू प्राईसमध्ये सवलत दिली जाईल. एनटीपीसीचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहे.
काही दिवसांपासून अनेक आयपीओला गुंतवणूकदारांचा थंड प्रतिसाद
वारी एनर्जीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. त्यांनतर आलेल्या अनेक आयपीओला गुंतवणूकदारांना थंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. सॅजिलिटी इंडिया,स्विगी, एसीएमई सोलार होल्डिंग्ज, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स या आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांनी थंड प्रतिसाद दिला.
इतर बातम्या :