अमेरिकेतील मोठी नोकरी सोडून बनला 'चहावाला', आज करतोय 2000 कोटींची उलाढाल
Success Story: अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून नितीन सलुजा यांनी चहाचा व्यवसाय सुरु केला. आज ते 2000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.
![अमेरिकेतील मोठी नोकरी सोडून बनला 'चहावाला', आज करतोय 2000 कोटींची उलाढाल Nitin Saluja Success Story Leaving the big job in America the tea business has a turnover of 2000 crores today अमेरिकेतील मोठी नोकरी सोडून बनला 'चहावाला', आज करतोय 2000 कोटींची उलाढाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/9f99e53b6fefb58923896b86bfd196ff1706077028100339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Success Story: अलिकडच्या काळात अनेक तरुण चांगल्या पगाराच्या नोकऱ्या (Job) सोडून शेतीत किंवा व्यवसायात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत. एका अशाच युवा उद्योजकाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. नितीन सलुजा (Nitin Saluja) असं या उद्योजकाचं नाव आहे. अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून नितीन सलुजा यांनी चहाचा व्यवसाय सुरु केला. आज ते 2000 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.
आपण आज चायोसचे (Chaayos) सह-संस्थापक नितीन सलुजा यांची यशोगाथा पाहणार आहोत. चायोस हे देशातील एक मोठे नाव आहे आणि त्यांचे देशभरात आउटलेट आहेत. नितीन सलुजा यांनी कठोर परिश्रम आणि प्रबळ इराद्याच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. नितीन सलुजा यांनी त्यांचा मित्र राघव वर्मा यांच्यासोबत ही यशोगाथा लिहिली. दोघांनी 2012 मध्ये चायोस सुरू केले. भारतातील हाय-एंड आउटलेट्सद्वारे चहा विकण्याचा हा एक अनोखा उपक्रम होता, ज्यामध्ये दोन्ही मित्रांना प्रचंड यश मिळाले.
नितीन सलुजा यांचे IIT मधून इंजिनीअरिंग
नितीन सलुजा यांनी आयआयटीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. यानंतर ते एका मोठ्या अमेरिकन कंपनीत रुजू झाले. 5 वर्षे नोकरी केल्यानंतर एके दिवशी ते लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय करण्यासाठी भारतात आला.
चायोस आता अल्पावधीतच भारतातील एक मोठा ब्रँड
चहा हे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पेय आहे. त्याद्वारे नितीन आणि राघव यांनी चायोस ब्रँडची स्थापना केली. दोन मित्रांनी मिळून 2012 मध्ये गुरुग्राममध्ये पहिला चायोस कॅफे उघडला. चायोसने आपल्या स्टार्टअपद्वारे चहाबाबत अनेक प्रयोग केले आणि ते सर्व यशस्वी ठरले. चायोस आपल्या ग्राहकांना चहाचे विविध प्रकार देत आहे. यामध्ये मसाला चहा, औषधी वनस्पती मिसळून तयार केलेला चहा यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे चहाचे हे विविध प्रकार ग्राहकांना आवडले. चायोस आता अल्पावधीतच भारतातील एक मोठा ब्रँड बनला आहे.
देशभरात चायोसच्या 200 ठिकाणी कॅफे
चायोसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, जुलै 2022 पर्यंत, Chaayos चे देशभरात 200 आउटलेट आहेत. त्याचवेळी, येत्या काही वर्षांत कंपनीला चायोस कॅफेचा हा आकडा 1000 पर्यंत नेणार आहे. 2012 मध्ये कंपनीचे उत्पन्न 52 कोटी रुपये होते. डीएनए रिपोर्टनुसार, चायोस ब्रँडची किंमत आता 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Kashmiri Kahwa : चहाप्रेमींनो, एकदा काश्मिरी काहवा पिऊन पाहा, आरोग्यवर्धक काहवाची सोपी रेसिपी!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)