एक्स्प्लोर

New Labour Laws 2026: दरमहा 50000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार? नव्या नियमांमुळे तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या A टू Z माहिती

New Labour Laws 2026: केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणाऱ्या 'न्यू लेबर कोड 2026' मुळे खासगी क्षेत्रातील नोकरदारांच्या पगार संरचनेत मोठे बदल होणार आहेत.

New Labour Laws 2026: केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणाऱ्या 'न्यू लेबर कोड 2026' मुळे खासगी क्षेत्रातील नोकरदारांच्या पगार संरचनेत मोठे बदल होणार आहेत. या नवीन नियमावलीचा सर्वात मोठा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (PF) होणार आहे. पगार 50 हजार रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे बदल नेमके कसे असतील, याबाबत जाणून घेऊयात...

New Labour Laws 2026: काय आहे 50 टक्क्यांचा नियम?

नव्या कायद्यानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याचा 'बेसिक पे' (Basic Salary) आणि महागाई भत्ता (DA) हा त्याच्या एकूण वार्षिक पगाराच्या (CTC) किमान 50 टक्के असणे अनिवार्य असेल. सध्या अनेक कंपन्या पीएफ कपात कमी करण्यासाठी बेसिक पगार कमी ठेवतात आणि भत्ते (Allowances) जास्त दाखवतात. आता मात्र 50 टक्क्यांहून अधिक असलेले इतर सर्व भत्ते थेट तुमच्या बेसिक सॅलरीमध्ये जोडले जातील.

New Labour Laws 2026:  50 हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याचे गणित 

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा दरमहा पगार 50 हजार रुपये असेल आणि सध्या त्याचा बेसिक पगार 20 हजार रुपये असेल, तर नव्या कायद्यानुसार तो किमान 25 हजार रुपये करावा लागेल.

1. मासिक पगारात घट: बेसिक पगार वाढल्यामुळे त्यातून कापली जाणारी पीएफची (PF) रक्कमही वाढणार आहे. पूर्वी 20 हजार बेसिकवर जेवढी कपात होत होती, त्याऐवजी आता 25 हजार बेसिकवर 12 टक्के दराने पीएफ कापला जाईल. यामुळे दरमहा हातात मिळणारा पगार (Take-home Salary) साधारणपणे 600 ते 800 रुपयांनी कमी होऊ शकतो. 50 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीला आता साधारण 44 हजार 400 रुपयांच्या आसपास नेट पगार मिळेल.

२. ग्रॅच्युइटीचा मोठा लाभ: हातात येणारा पगार थोडा कमी होणार असला, तरी निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत मोठा फायदा होणार आहे. ग्रॅच्युइटीची गणना मूळ पगारावर (Basic Pay) केली जाते. बेसिक वाढल्याने एका वर्षाच्या सेवेची ग्रॅच्युइटी अंदाजे 14 हजार 423 रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यास 72 हजार रुपयांहून अधिक रक्कम ग्रॅच्युइटी म्हणून मिळेल.

३. निवृत्तीनंतरची पुंजी वाढणार: दरमहा पीएफमध्ये होणारी अधिकची कपात ही एक प्रकारे सक्तीची गुंतवणूक ठरणार आहे. पीएफमध्ये कर्मचाऱ्यासोबतच कंपनीचाही वाटा वाढणार असल्याने, निवृत्तीच्या वेळी चक्रवाढ व्याजासह तुमच्या खात्यात मोठी रक्कम जमा झालेली असेल.

New Labour Laws 2026: भविष्यातील सुरक्षेला प्राधान्य

थोडक्यात सांगायचे तर, नवीन कामगार कायदे नोकरदारांच्या सद्यस्थितीतील खर्चापेक्षा त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेवर अधिक भर देतात. आज खिशात थोडी कमी रक्कम आली तरी, नोकरी सोडताना किंवा निवृत्तीच्या वेळी मिळणारा निधी हा जुन्या पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आणि सुरक्षित असणार आहे.

आणखी वाचा 

LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा तडाखा

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget