'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ऑडी क्यू7 आमचे सर्वात आयकॉनिक उत्पादन असण्यासोबत सेलिब्रिटींसह सर्व लक्ष्य समूहांमध्ये लोकप्रिय आहे.
मुंबई : जगभरातील प्रसिद्ध कार कंपनी असलेल्या ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू 7 या नव्या कारसाठी बुकिंगला सुरूवात केली आहे. नवीन ऑडी क्यू7 ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्ट' अॅप्लीकेशनच्या माध्यमातून 2,00,000 रूपयांच्या सुरूवातीच्या बुकिंग रकमेमध्ये बुक करता येऊ शकते. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल प्लांट येथे स्थानिक पातळीवर असेम्बल करण्यात आलेली नवीन ऑडी क्यू7 भारतात 28 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच करण्यात येईल. 340 एचपी शक्ती आणि 500 एनएम टॉर्क निर्माण करणारे शक्तिशाली 3.0 लिटर व्ही6 टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी क्यू7 फक्त 5.6 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्त करू शकते आणि अव्वल गती 250 किमी/तास आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ऑडी क्यू7 आमचे सर्वात आयकॉनिक उत्पादन असण्यासोबत सेलिब्रिटींसह सर्व लक्ष्य समूहांमध्ये लोकप्रिय आहे. नवीन ऑडी क्यू7 सह आम्ही सुधारित वैशिष्ट्ये, नवीन एक्स्टीरिअर डिझाइन आणि नवीन लक्षवेधक लाइट्स देत आहोत. आम्ही औरंगाबादमधील आमच्या ग्रुप प्लांटमध्ये नवीन ऑडी क्यू7 च्या स्थानिक असेम्ब्लीला सुरूवात केली आहे आणि 28 नोव्हेंबर 2024 रोजी ही वेईकल लाँच करण्यास सज्ज आहोत.'' नवीन ऑडी क्यू7 साखीर गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, समुराई ग्रे आणि ग्लेशियर व्हाइट या पाच एक्स्टीरिअर रंगांमध्ये तसेच इंटीरिअर सिडार ब्राऊन आणि सायगा बीज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (ऑडीडॉटइन) आणि ‘मायऑडी कनेक्ट' अॅपच्या माध्यमातून ऑडी क्यू7 ऑनलाइन बुक करू शकतात.
हेही वाचा