Gold and Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4 हजारांनी तर, चांदी 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Gold and Silver Price: सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold and Silver Rate: तुळशीचं (Diwali 2026) लग्न झालं की, लग्नसराईची लगबग सुरु होते. लग्न म्हटलं की सोनं खरेदी (Gold rate) आलंच. सोनं - चांदी (Gold And Silver Rate) खरेदीसाठी ग्राहकांची रांग सराफाच्या दुकानाबाहेर लागते. सोन्याचा भाव वाढला की, लोक सोनं खरेदी करताना थोडा विचार करतात. कारण सोन्याचे भाव गगनाला भिडले की, मग सोनं खरेदी करताना खिशाला कात्री बसते, एवढं मात्र नक्की. पण गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना दिलासा देणारा सोन्याचा भाव समोर येत आहे. सोने अन् चांदीच्या दरात (Gold and Silver price) पुन्हा मोठी घसरण झाली असल्याची माहिती आहे. सोन्याच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण तर, चांदीच्या दरात (Silver Rate) 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आजचा लेटेस्ट दर किती? पाहूयात.
सोनं अन् चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा (Gold and Silver Prices Fall Sharply)
सोने आणि चांदी दरात पुन्हा मोठी घसरण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. काल म्हणजेच 24 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर 126000 रुपये इतके होते. तर, आज 25 नोव्हेंबर 2026 रोजी दरात घसरण झाल्यानंतर सोन्याचे दर 122000 रुपये इतके झाले आहे. केवळ सोन्याच्या दरात घसरण झाली नाही तर, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. काल म्हणजे 24 नोव्हेंबर 2026 रोजी चांदीचे दर 158000 रुपये इतके होते. तर, आज 25 नोव्हेंबर 2026 रोजी चांदीचा दर 148000 रुपयांवर पोहोचला आहे. घसरलेले दर पाहून नक्कीच ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकन फेडरल बँकाच्या व्याज दरात वाढ होण्याची शक्यता पाहता, आणि डॉलर वधारल्याचा हा परिणाम मानला जात आहे. दोन्ही दर जी एस टी शिवायचे आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजाराची काय आहे स्थिती? (Gold Drops by Rs 4000 and Silver by Rs 10000)
आंतरराष्ट्रीय बाजार कॉमेक्समध्ये तर सोन्याची किंमत 3,555.60 डॉलर प्रति औंस झाली आहे. मात्र IBJA नुसार 24 कॅरेट सोने 1,24,945 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 23 कॅरेट सोने 1,24,445 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 1,14,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, 18 कॅरेट सोने 93,709 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 73,093 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजार यूएस कॉमेक्समध्ये चांदीची किंमत 40.72 डॉलर प्रति औंसवर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या





















