(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, सरकारच्या तिजोरीत भर
देशातील प्रत्यक्ष कर संकलनात (direct tax collection) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.
Direct Tax Collection : देशातील प्रत्यक्ष कर संकलनात (direct tax collection) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. 1 एप्रिल 2023 ते 16 सप्टेंबर 2023 पर्यंत देशाचे प्रत्यक्ष कर संकलन 23.5 टक्क्यांनी वाढून 8.65 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आगाऊ कर संकलनही 20.7 टक्क्यांनी वाढून 3 लाख 55 हजार 481 कोटी रुपये झाले आहे.
प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 4.16 लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेशन कर आणि 4.47 लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर देखील समाविष्ट आहे. ज्यामध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) समाविष्ट आहे. एकंदर जमा झालेल्या 8 लाख 65 हजार 177 कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात कंपनी प्राप्तिकर 4,16, 217 कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकरासह, रोखे उलाढाल कराच्या (एसटीटी) रुपाने 447291 कोटी रुपये समाविष्ट आहेत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जमा केल्या जाणाऱ्या अग्रिम कराच्या दुसऱ्या हप्त्यांच्या रूपात एकूण 3.55 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 2.94 लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत 21 टक्के अधिक आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन 9,87,061 कोटी रुपये आहे. जे गेल्या वर्षी 8,34,469 कोटी रुपये होते. अशा प्रकारे 18.29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, करचुकवेगिरी मोठ्या प्रमाणात होत होती. ते थांबवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हळूहळू यश मिळत आहे. कर संकलन प्रक्रियेत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यात उपयुक्त ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Direct Tax : सरकारची तिजोरी भरली, 10 ऑगस्टपर्यंत 6.53 लाख कोटी प्रत्यक्ष कर जमा, 15.7 टक्क्यांची भरघोस वाढ