एक्स्प्लोर

नव्या वर्षात अंबानी मोठा धमाका करण्याच्या तयारीत; आता 'या' क्षेत्रात दबदबा वाढवण्यासाठी सज्ज

Jio Financial आणि BlackRock नं म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश करण्याच्या उद्देशानं परवान्यासाठी अर्ज करून 19 ऑक्टोबर 2023 रोजी SEBI कडे कागदपत्रे सादर केली आहेत.

Mukesh Ambani Mutual Fund License: मुंबई : जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टॉपवर असणारे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. आता अंबानी एका नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. अंबानी आपल्या नव्या कंपनीसह म्युच्युअल फंड उद्योगात दमदार एन्ट्री घेण्याची तयारी करत आहेत. म्युच्युअल फंड (Mutual Fund) मार्केटमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी अंबानींची जिओ फायनान्शिअलनं (Jio Financial) ब्लॅकरॉकसह (BlackRock) एकत्र येत मार्केट रेग्युलेटर सेबीकडे (SEBI) अर्ज केला आहे. 

म्युच्युअल फंड उद्योगात दबदबा निर्माण करण्यासाठी अंबानी सज्ज 

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, जिओ फायनान्शिअल लवकरच म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी त्यांनी ब्लॅकरॉकच्या सहकार्यानं सेबीकडे अर्ज केला आहे. त्यात म्हटलं आहे की, मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी Jio Financial Services Ltd आणि BlackRock Financial Management यांना तत्वतः मान्यता देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सेबीनं जारी केलेल्या एमएफ अर्जदारांच्या यादीतून ही माहिती समोर आली आहे.

सेबीकडून नव्या अर्जदारांची यादी जाहीर  

Jio Financial Limited चा BlackRock सोबत एक संयुक्त उपक्रम (JV) आहे, जो त्यांचं मालमत्ता व्यवस्थापन करते. रिपोर्ट्सनुसार, 19 ऑक्टोबर, 2023 रोजी, म्युच्युअल फंड मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशानं परवान्यासाठी अर्ज करणारी कागदपत्रं SEBI कडे सादर केली आहेत आणि सध्या यासंदर्भात पुढची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, म्युच्युअल फंड अर्जदारांची यादी SEBI द्वारे दर महिन्याला तिमाहीच्या शेवटी अपडेट केली जाते.

जुलै 2023 मध्ये जॉईंट वेंचरची घोषणा 

गेल्यावर्षी, जुलै 2023 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुप कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि यूएस स्थित ब्लॅकरॉक इंक म्हणाले होते की, दोघेही भारतात मालमत्ता व्यवस्थापन सेवा सुरू करण्यासाठी 50:50 संयुक्त उपक्रम तयार करतील. जिओ फायनान्शिअलच्या वतीनं या संदर्भात निवेदन जारी करताना, असं म्हटलं आहे की, दोन्ही कंपन्यांनी संयुक्त उपक्रमात 150 दशलक्ष डॉलर्सच्या प्रारंभिक गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं आहे. या अर्जाला SEBI ची मान्यता मिळाल्यास, BlackRock DSP सोबतचा संयुक्त उपक्रम संपवल्यानंतर जवळपास 5 वर्षांनी या व्यवसायात पुन्हा प्रवेश करेल.  

5 वर्षांनी पुन्हा 'या' मार्केटमध्ये एन्ट्री 

Jio Financial Services ला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये उतरण्यासाठी लायसन्स देण्याच्या प्रस्तावावर अद्याप सेबीकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. BlackRock हा एसेट मॅनेजर्स सेक्टरमध्ये सर्वात मोठा फंड राहिला आहे. यापूर्वी डीएसपी ब्लॅकरॉक (DSP BlackRock) म्हणून ओळखली जात होती. परंतु, 2018 मध्ये दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षांनंतर आता पुन्हा एकदा ब्लॅकरॉक मुकेश अंबानींच्या जियो फायनान्शिअल सर्विसेजसोबत मार्केटमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज आहे. या बातमीमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्येही वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी शेअर बाजार (Share Market) उघडल्यानंतर जिओ फायनान्शियल शेअर्स सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.

(टीप : शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget