एक्स्प्लोर

ना बिल्डरची मदत, ना बँकेचे कर्ज, लोकांनीच उभी केली 23 मजली इमारत, मुलुंडमधील पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा!

मुलुंडमधील पूर्वरंग हाऊसिंग सोसायटीने स्वत:च्या हिमतीने त्यांच्या घरांचा पुनर्विकास केला आहे. त्यांच्या या अभिनव प्रकल्पाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

मुंबई : मुंबई, उपनगरांत हाऊसिंग सोसायट्यांच्या (Housing Society) पुनर्विकास करणे म्हणजे फार जिकरीचं काम. या घरांचा पुनर्विकास करायचा म्हणजे एखाद्या बिल्डरला हाताशी धरावं लागतं. त्यानंतर हे बिल्डर्स त्यांच्या सोईनुसार नफेखोरीला केंद्रस्थानी ठेवून पुनर्विकास करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांची निराशा होते. मात्र मुलुंडमध्ये लोकांनी एक भन्नाट प्रयोग पुर्नत्त्वास नेला आहे. कोणत्याही बिल्डरला हाताशी न धरता या लोकांनी स्वत:च घरांचा पुनर्विकास केला आहे. ज्यामुळे त्यांना अगोदरपेक्षा अधिक मोठी घरं मिळाली आहेत. सोबतच घरांच्या पुनर्विकासासाठी जेवढा पैसा लावला होता, तो संपूर्ण पैसा या लोकांनी अतिरिक्त घरं विकून परत मिळवला आहे. मुलुंडमधील या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. 

पूर्वरंग हाऊसिंग सोसायटीची कमाल

मुलुंडमधील पूर्वरंग कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीने स्वत:च्या घरांचा स्वत:च पुनर्विकास केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प करताना त्यांनी कसलेही कर्ज घेतलेले नाही. तसेच कोणत्या बिल्डरलाही कंत्राट दिलेले नाही. एकूण 56 कुटुंबांनी सतत सात वर्षे मेहनत घेऊन कोणतेही कर्ज न घेता एकूण 23 मजली इमारत उभी केली आहे. या 56 कुटुंबांनी एकदिलाने काम करून उभे केले आहेत. स्वत: कंत्राटदार नेमून हवी तशी इमारत उभी केली आहे. याच कारणामुळे कोणतेही कर्ज न घेता स्वत:च पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास जाणारा हा पहिला प्रयोग ठरला आहे.

आता आता मिळाले 1015 स्क्वेअर फुटांचे घर 

पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद महाडिक यांनी त्यांच्या या अभिनव प्रयोगाबाबत अधिक माहिती दिली आहे. या सोसायटीचे लोक कधीकाळी 390 स्क्वेअर फुटाच्या घरात राहायचे. आता या पूनर्विकासातून या कुटंबांना तब्बल 1015 स्क्वेअर फुटाचे तीन बीएचके घर मिळाले  आहे. कोणत्याही विकासकाची मदत न घेता स्वत: हाऊसिंग सोसायटीनेच घरांचा पुनर्विकास करावा, अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर प्रभू यांनी मांडली होती. मंगळवारी त्यांच्याच हाताने सोसायटीतील कुटुंबांना पुनर्विकास झालेल्या नव्या घरांच्या प्रतिकात्मक चाव्या देण्यात आल्या.

अतिरिक्त घरं विकून खर्च झालेला पैसा परत मिळवला

पूर्वरंग हाऊसिंग सोसायटीने पुनर्विकास केलेल्या इमारतीत आता एकूण 118 फ्लॅट्स आहेत. यातील 56 घरे ही सोसायटीतील सदस्य कुटुंबाना देण्यात आले आहेत. तर उर्वरित फ्लॅट्स हे विकण्यात आले आहेत. या लोकांनी एकूण 62 घरांपैकी ५७ घरं विकली आहेत. या घरांच्या विक्रीतून एकूण 85 कोटी रुपये मिलाले आहेत. या सोसायटीतील कुटुंबानी ही नवी इमारत उभारण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले होते, तेवढे पैसे ही 57 घरं विकून परत मिळाली आहेत. 

मुलुंडच्या या अभिनव प्रकल्पाची सगळीकडे चर्चा

दरम्यान, कोणत्याही विकासकाची मदत न घेता, कोणतेही कर्ज न घेता सोसायटीचा पुनर्विकास केल्यामुळे या कुटुंबाची सर्वत्र वाहवा होत आहे. अगोदर 390 स्क्वेअर फुटात राहणारी ही माणसं आता थेट एक हजार स्वेअर फुटाच्या घरात राहात आहेत. त्यांच्या या अभिनव प्रकल्पांची सगळीकडे चर्चा होत आहे.  

हेही वाचा :

एलॉन मस्क यांची भारताकडे पाठ, आता थेट चीनच्या दौऱ्यावर; टेस्ला कारविषयी होणार महत्त्वाची चर्चा!

गृहप्रकल्पातील सुखसुविधा, सोईसुविधांसाठी महारेराचा नवा नियम, लवकरच घर खरेदीदारांची डोकेदुखी कमी होणार!

घरासमोर 50 रोल्स रॉयस, 1000 कोटीच्या हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर, भारताचे पहिले अब्जाधीश कोण होते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Embed widget