मदर डेअरीनं मुंबईतील ग्राहकांसाठी लाँच केलं शुद्ध 'म्हशीचं दूध', दुधाची किंमत किती?
मदर डेअरी (Mother Dairy) ही भारतातील आघाडीची दूध आणि दुग्धजन्य उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आज संपूर्ण मुंबई विभागातील ग्राहकांसाठी शुद्ध म्हशीचे दूध (बफेलो मिल्क) (Buffalo Milk) लाँच केले.
Mother Dairy Buffalo Milk : मदर डेअरी (Mother Dairy) ही भारतातील आघाडीची दूध आणि दुग्धजन्य उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आज संपूर्ण मुंबई विभागातील ग्राहकांसाठी शुद्ध म्हशीचे दूध (बफेलो मिल्क) (Buffalo Milk) लाँच केले. हा नवीन प्रकार ग्राहकांच्या डेटाच्या आधारे विकसित केला गेला आहे. ज्याचे उद्दिष्ट विशिष्ट गरजांनुसार दुधाच्या प्रकारांची मागणी पूर्ण करणे आहे. ग्राहकांना अधिक समृद्ध आणि क्रीमियर अनुभव देणारा, नवीन प्रकार मुंबईच्या बाजारपेठेत 25 जूनपासून म्हणजे आजपासून उपलब्ध झाला आहे.
हा नवीन प्रकार ग्राहकांच्या विशिष्ट गरजांसाठी सुप्त मागणी पूर्ण करेल आणि बाजारात कंपनीच्या दूध पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करेल. मदर डेअरी म्हशीचे दूध मलईदार आणि A2 प्रोटीनसह उच्च FAT आणि SNF सह चवदार आहे. हे दूध 500 मिली आणि 1 लिटरच्या सोयीस्कर पॅक आकारात उपलब्ध करण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्याने सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेलवर हे दुध उपलब्ध केले जाईल.
मदर डेअरी म्हशीचे दूध 6.5 टक्के फॅट कंटेंटचे
मदर डेअरी म्हशीचे दूध 6.5 टक्के फॅट कंटेंट आणि 9 टक्के SNF (सॉलिड नॉट फॅट) देते, ते क्रीमियर पोत आणि उत्तम चव देते. नियमित सेवनासाठी उत्तम पर्याय असण्याबरोबरच, मदर डेअरी म्हशीचे दूध हे स्वयंपाकाची आवड असणाऱ्या लोकांसाठी एक उपयुक्त पदार्थही ठरेल. ज्यांना किचनमध्ये प्रयोग करायला आवडतात त्यांच्यासाठी एकंदर स्वयंपाकाचा अनुभव वाढवून, चवदार मिष्टान्न तयार करण्यासाठी त्याचा क्रीमीपणा परिपूर्ण बनवतो. शिवाय, नवीन प्रकारात A2 प्रोटीनचा समावेश असेल. याबद्दल बोलताना मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री मनीष बंदलीश यांनी सांगितले की, मदर डेअरीमध्ये, आम्ही ग्राहककेंद्रिततेच्या विचाराने चालतो, आम्ही ऑफर करत असलेल्या प्रत्येक उत्पादनाचा केंद्रबिंदू ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवतो. 5 दशकांहून अधिक काळातील कृषी उत्पादन हाताळण्याच्या आमच्या निपुणतेसह ग्राहकांच्या माहितीच्या आमच्या विस्तृत ज्ञानामुळे आमच्यासाठी नवनवीन शोध आणि विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी उपाय ऑफर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन लाँच केलेले उत्पादन त्याच धोरणानुसार आहे. हे अनेक पैलूंना संबोधित करते. साधे दूध पिने असो किंवा इतर कोणताही वापर, विशिष्ट दुधाची आवश्यकता पूर्ण करणे, किंवा जे सुट्या दुधापासून पॅकेज्ड दुधाकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे. आम्हाला खात्री आहे की नवीन प्रकार त्वरीत घरोघरी पसंतीस उतरेल असे बंदलीश म्हणाले.
म्हशीचे दूध 500 मिली आणि 1 लिटर मध्ये उपलब्ध
मदर डेअरी शुद्ध म्हशीचे दूध हे 500 मिली आणि 1 लिटर मध्ये उपलब्ध केले आहे. एक लिटर दुधासाठी 72 रुपये माजावे लागणार आहेत. तर फॅट आणि एसएनएफ 6.5 टक्के FAT आणि 9 टक्के SNF असणार आहे.
म्हशीचे दूध टप्प्याटप्प्याने सर्वत्र उपलब्ध होणार
नव्याने सादर करण्यात आलेले मदर डेअरी म्हशीचे दूध कंपनीच्या संपूर्ण वितरण नेटवर्कवर ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेलसह टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल. ब्रँड त्याच्या लक्ष्यित प्रेक्षकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी एक व्यापक विपणन मोहीम देखील सुरू करणार आहे. मुंबईत, मदर डेअरीकडे आधीच 05 दुधाच्या प्रकारांचा मजबूत पोर्टफोलिओ आहे, ज्यात आईस्क्रीम, दही, दुग्धजन्य पेये यांसारख्या स्वादिष्ट डेअरी उत्पादनांच्या श्रेणीशिवाय गायीचे दूध, फुल क्रीम मिल्क, टोन्ड मिल्क, डबल टोन्ड मिल्क, पनीर इत्यादींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या: