(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CNG Gas : मुंबईकरांना मोठा दिलासा; घरपोच इंधन देणार मोबाइल सीएनजी स्टेशन
Fuel Delivered At Doorstep: मुंबईकरांची आता सीएनजी गॅस स्टेशनवरील रांगांमधून सुटका होणार आहे.आता थेट घरपोच सीएनजी गॅस मिळणार आहे.
Fuel Delivered At Doorstep: मुंबईत आता लवकरच घरापोच सीएनजी इंधन मिळणार आहे. एनर्जी स्टार्टअप 'दी फ्यूल डिलिव्हरी'ने महानगर गॅस लिमिटेडसोबत एक करार केला आहे. त्यानुसार आता शहरात मोबाइल सीएनजी स्टेशनची स्थापना करण्यात येणार आहे. या मोबाइल सीएनजी स्टेशनच्या मदतीने ग्राहकांना त्यांना घरपोच सीएनजी इंधन पुरवण्यात येणार आहे.
The Fuel Delivery ने प्रसिद्धीस केलेल्या माहितीनुसार, ही सेवा 24 तास आणि आठवडाभर सुरू असणार आहे. त्यामुळे सीएनजी इंधनावर चालणारे टॅक्सी, रिक्षा, खासगी आणि व्यावसायिक वाहने, शालेय बसेस यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपात्कालीन परिस्थितीत ग्राहकांना सीएनजी उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय, सीएनजी स्टेशनवर वाहनांच्या लांब रांगांमधून नागरिकांची सुटका होणार आहे.
तीन महिन्यात सुरू होणार सुविधा
The Fuel Delivery ने म्हटले की, मुंबईत दोन मोबाइल सीएनजी स्टेशन चालवण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने मंजुरी दिली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये मुंबईतील शीव (सायन) आणि नवी मुंबईतील म्हापे येथे ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सेवा मुंबई, नवी मुंबईतील इतर भागांमध्येही सुरू होणार आहे.
The Fuel Delivery चे संस्थापक सीईओ रक्षित माथुर यांनी सांगितले की, आम्ही देशभरातील विविध शहरांमध्ये घरपोच डिझेल पुरवठा सेवा सुरू केली. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता आम्ही सीएनजी गॅसचाही पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई आणि जवळपासच्या परिसरात महानगर गॅस लिमिटेड हा मुख्य सीएनजी गॅस वितरक आहे. पीएनजी आणि सीएनजी गॅस वितरण, विक्रीत महानगर गॅसची मक्तेदारी आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: