Gensol Engineering: गैरव्यवस्थापन, घोटाळेबाज! ब्लूस्मार्ट कॅब सागामुळे सोशल मिडियावर मोठी खळबळ, काहींनी काढली लाज तर काहींनी व्यक्त केली चिंता
Gensol Engineering: सोलर कंपनी जेनसोल इंजिनिअरिंगचे संस्थापक-डायरेक्टर अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. सेबीच्या अंतरिम आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवी दिल्ली: अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी आणि जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेड (जीईएल) यांच्यातील ब्लूस्मार्ट कॅब सागामुळे इंटरनेटवर सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. नेटिझन्सनी व्यवसाय जगतातील संस्थापकांच्या कामावरती आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने GEL आणि त्यांच्या संस्थापक, जग्गी ब्रदर्स यांच्याविरुद्ध वैयक्तिक खर्चासाठी निधीचा गैरवापर आणि पैसे वळवल्याबद्दल कठोर आदेश जारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सेबीच्या तपासणीत असे आढळले की, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा वापर करून संस्थापकांनी लक्झरी अपार्टमेंट खरेदी केली आणि वैयक्तिक खर्चासाठी निधी वळवला. या प्रकरणामुळे ब्लूस्मार्टने त्यांच्या सेवांवर तात्पुरती बंदी घातली आहे, ज्यामुळे हजारो चालकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. या घोटाळ्यामुळे इंटरनेटवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी संस्थापकांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लूस्मार्टने ग्राहकांना 90 दिवसांच्या आत परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे,
ब्लूस्मार्ट कॅब सेवा आणि जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड (GEL) या कंपनीसंदर्भातील प्रकरणाने इंटरनेटवर मोठा खळबळ माजवली आहे. संस्थापक अणमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावरील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि पारदर्शकतेअभावी अनेक नेटिझन्सनी त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही प्रतिक्रिया तेव्हा समोर आली जेव्हा सेबीने(SEBI) GEL आणि जग्गी बंधूंविरुद्ध कडक आदेश काढत त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी निधींच्या गैरवापर व वळवण्याच्या प्रकारांवर कारवाई केली.
ब्लूस्मार्ट प्रकरणामुळे इंटरनेटवर संतापाचा उद्रेक
ब्लूस्मार्ट कॅब प्रकरणामुळे इंटरनेटवर प्रचंड संताप उसळला असून, व्यावसायिक संस्थापकांच्या फसवणूक व लोभामुळे देशाची मान खाली घालावी लागत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त होत आहे. संस्थापकांच्या प्रामाणिकतेत झालेली घसरण, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि जनतेच्या विश्वासाशी केलेली गद्दारी यामुळे हा प्रकार अधिकच निंदनीय ठरत आहे.
The saddest part of the whole Gensol & BluSmart saga is that from now on, founders with real intent who step in front of investors will have to face the burden of this deceit.
— Anirudh A Damani (@showmedamani) April 16, 2025
Let’s not let fraud define the future.#GenStole #BluScam #Fraud pic.twitter.com/yurWRKcl6c
सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट
@rajivtalreja या सोशल मिडिया वापरकर्त्याने एक्सवरती म्हटले आहे की, “किती लाजिरवाणी गोष्ट आहे... संस्थापकांनी वैयक्तिक वापरासाठी निधी वळवल्याच्या आणखी एका प्रकरणामुळे BluSmart बंद पडला आहे...भारतीय संस्थापकांनी गंभीरपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे... यापैकी बहुतेक स्टार्टअप ब्रदर्स हे व्यवसायाच्या कल्पना असलेल्या तीक्ष्ण विचाराचे, पैसे उभारण्याचे, परंतु दीर्घकालीन काहीतरी निर्माण करण्याचा हेतू आणि प्रामाणिकपणाचा अभाव असलेले एक उत्कृष्ट उदाहरण आहेत... ज्या क्षणी हे जोकर पैसे उभारतात, त्यांचा लोभ वाढतो, ते उघडकीस येण्यासाठी आणि भारताला अधिक लाज आणण्यासाठी अशा मूर्ख गोष्टी करतात... लानत है इन बेवकोफोन पर..."
What a shame… BluSmart goes down thanks to yet another case of Founders diverting funds for personal use…
— Rajiv Talreja (@rajivtalreja) April 16, 2025
Indian Founders need to do some serious soul searching… Most of these Startup bros are a classic case of sharp minds with a business idea, raising money on astronomical…
What a shame… BluSmart goes down thanks to yet another case of Founders diverting funds for personal use…
— Rajiv Talreja (@rajivtalreja) April 16, 2025
Indian Founders need to do some serious soul searching… Most of these Startup bros are a classic case of sharp minds with a business idea, raising money on astronomical…
व्यवसाय जगतात प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित करताना, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील @iashishjuneja या युजरने लिहिले: "आर्थिक गैरव्यवस्थेमुळे आणखी एक आशादायक स्टार्टअप अडचणीत येताना पाहणं खूप दुःखद आहे — आजच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रामाणिकतेला पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आहे."
यातील गुंतवणूकदार आणि भागधारकांची यादी उघड करून ब्लूस्मार्टवर टीका करताना, @malpani हे सोशल मिडिया युजर म्हणाले, “असे दिसते आहे की ब्लूस्मार्टने अनेक गुंतवणूकदारांना फसवले आहे.”
Looks like #BluSmart took lots of investors for a ride
— Dr Aniruddha Malpani, MD (@malpani) April 16, 2025
( pardon the pun !) pic.twitter.com/Mlm4hxsvP5
व्यवसाय जगतात प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित करताना, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील @iashishjuneja या युजरने लिहिले, "आर्थिक गैरव्यवस्थेमुळे आणखी एक आशादायक स्टार्टअप अडचणीत येताना पाहणं खूप दुःखद आहे — आजच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रामाणिकतेला पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आहे."
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील @GabbarSingh या युजरने उपरोधिक टिप्पणी करत लिहिले: "भारतामध्ये संपत्ती निर्माण करायची असेल, तर केवळ हुशार असून भागत नाही… ब्लूस्मार्ट देखील व्हावं लागतं."
I have realised to create wealth in India just being smart isn’t enough, you have to be BluSmart.
— Gabbar (@GabbbarSingh) April 16, 2025
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील @showmedamani या युजरने संपूर्ण Gensol आणि BluSmart प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त करत लिहिले, "या संपूर्ण Gensol आणि BluSmart प्रकरणातील सर्वात दुःखद बाब म्हणजे , आता खऱ्या उद्देशाने काम करणारे संस्थापक जेव्हा गुंतवणूकदारांसमोर जातील, तेव्हा त्यांना या फसवणुकीच्या सावलीतून जावं लागेल. फसवणूक आपल्या भविष्याची ओळख ठरू देऊ नको."
भारतातील कॉर्पोरेट व्यवस्थेतील नव्या जोखमी व समस्यांकडे लक्ष वेधताना, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील @mkpandey67 या युजरने लिहिले, "भारताच्या कॉर्पोरेट विश्वासाठी आज सर्वात मोठे धोके म्हणजे खालावत चाललेले नैतिक व प्रशासनिक मानदंड. गुंतागुंतीच्या कॉर्पोरेट संस्थांच्या जाळ्याला आता प्रोत्साहन देणे थांबवले पाहिजे. दु:खाची बाब म्हणजे IREDA आणि PFC यांसारख्या संस्था IL&FS घोटाळ्यापासूनही काही शिकल्या नाहीत."
ब्लूस्मार्ट कॅब प्रकरण
भारतीय शेअर बाजार नियंत्रण मंडळ (SEBI) ने मंगळवारी दिलेल्या आदेशामुळे Gensol Engineering आणि BluSmart या दोन कंपन्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त झाल्या आहेत. ब्लूस्मार्ट ही एक नावाजलेली इलेक्ट्रिक कॅब स्टार्टअप असून, तिची स्थापना अनमोल जग्गी यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
SEBI च्या तपासणीनुसार, Gensol साठी इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदीसाठी ठेवलेले निधी संस्थापकांनी वैयक्तिक खर्चासाठी वळवले. या प्रकारामुळे BluSmart च्या आर्थिक पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
EV कॅब क्षेत्रातील नावाजलेली कंपनी
ब्लूस्मार्ट ही कंपनी भारतातील EV कॅब सेवा क्षेत्रात वेगाने विस्तार करत होती. मात्र आता SEBI च्या निष्कर्षांनंतर या कंपनीची कार्यपद्धती व आर्थिक व्यवस्थापन तपासणीखाली आली आहे.
6400 EV खरेदीचे उद्दिष्ट पण…
SEBI च्या अहवालानुसार, Gensol ने IREDA आणि Power Finance Corporation (PFC) यांच्याकडून 6400 इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी आर्थिक मदत घेतली होती. प्रत्यक्षात त्यांनी केवळ 4,704 वाहनेच खरेदी केली, आणि अंदाजे ₹262 कोटींचा निधी गैरवापरात गेला.
निधी कुठे गेला?
तपासणीत असे समोर आले की, उर्वरित निधी लक्झरी रिअल इस्टेट खरेदी आणि इतर गैरसंबंधित व्यवसायांमध्ये गुंतवला गेला, ज्याचा कोणताही संबंध EV क्षेत्राशी नव्हता.
























