एक्स्प्लोर

LIC Siddhartha Mohanty : सिद्धार्थ मोहंती LIC चे हंगामी अध्यक्ष, किती आहे पगार? जाणून घ्या...

LIC Interim Chairperson : सिद्धार्थ मोहंती यांच्यावर LIC च्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Sidharth Mohanty LIC Interim Chairperson : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या (LIC) हंगामी अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती (Siddhartha Mohanty) यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सांगितलं आहे की, जून महिन्यापर्यंत एलआयसीच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. केंद्र सरकारने 11 मार्च रोजी सिद्धार्थ मोहंती यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सिद्धार्थ मोहंती हे 14 मार्चपासून तीन महिन्यांसाठी LIC च्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. यानंतर एलआयसी जूनपर्यंत पूर्णवेळ अध्यक्षांची निवड करेल. 

सिद्धार्थ मोहंती LIC चे हंगामी अध्यक्ष

सिद्धार्थ मोहंती सध्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांच्या भूमिकेव्यतिरिक्त सरकारी मालकीची विमा कंपनी एलआयसीचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक (MD -Managing Director) सिद्धार्थ मोहंती यांची अध्यक्षपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India ) ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी सरकारी विमा कंपनी आहे. कंपनीची पॉलिसी घेणार्‍या लोकांमध्ये गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्याच जणांचा समावेश आहे. 

मोहंती यांच्यासमोर मोठं आव्हान

एलआयसी गुंतवणुकीबाबत वादात सापडली आहे. अशात आता कंपनीचे एमडी सिद्धार्थ मोहंती अशा वेळी एलआयसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारत आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. एलआयसीच्या अदानी समूहातील गुंतवणुकीमुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. 

कोण आहे सिद्धार्थ मोहंती?

सिद्धार्थ मोहंती यांची फेब्रुवारी 2021 मध्ये LIC चे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून निवड झाली होती. यावर्षी जूनमध्ये त्यांची सेवानिवृत्ती होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. एलआयसीमध्ये त्यांच्यासोबत आणखी दोन व्यवस्थापकीय संचालकही आहेl. एलआयसीचे एमडी म्हणून रुजू होण्यापूर्वी मोहंती एलआयसी हाउसिंग फायनान्सचे एमडी आणि सीईओ होते. त्यांना चार दशकांचा अनुभव आहे. सिद्धार्थ मोहंती त्यांनी 1985 मध्ये थेट भरती प्रक्रियेक अधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 

मोहंती यांचा मासिक पगार किती?

सिद्धार्थ मोहंती यांची फेब्रुवारी 2021 मध्ये एमडी म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक पदी निवड करण्यात आली. त्यांचं मासिक वेतन 2,05,400 ते 2,24,400 रुपये आहे. त्याचबरोबर आता हंगामी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पगारात आणखी वाढ होणार आहे.

LIC ची अदानी समूहातील गुंतवणूक धोक्यात?

एलआयसीची (LIC) अदानी समूहातील गुंतवणूक (LIC Investment In Adani Groups) धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. एलआयसीने अदानी समूहातील (Adani Group) कंपन्यांमध्ये 30,127 कोटींची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचे मूल्य 24 जानेवारी रोजी 81,268 कोटी रुपये इतके झाले होते. मात्र, मागील महिनाभरापासून हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होत आहे. त्यामुळे LIC ची अदानी समूहातील गुंतवणूक धोक्यात असल्याची चर्चा सुरु आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIC Investment In Adani : हिंडेनबर्ग रिपोर्ट: फक्त अदानी समूहावर नव्हे तर LIC वरही परिणाम! वाचा नेमकं काय झालं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget