एक्स्प्लोर

LIC GST Notice :  LIC ला मोठा झटका, 806 कोटींची GST नोटीस; तरीही शेअर दर वधारला

LIC : एलआयसीला विमा कंपनीला 806 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे.

LIC GST Notice :  सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी (LIC) ला 2024 च्या सुरुवातीला मोठा झटका बसला आहे. विमा कंपनीला 806 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. नोटीसनुसार, यामध्ये 365.02 कोटी रुपयांचा जीएसटी, 404.7 कोटी रुपयांचा दंड आणि 36.5 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. या नोटिशीच्या विरोधात अपील करणार असल्याचे एलआयसीने म्हटले आहे.

कंपनीने नियामकाला दिली माहिती

भारतीय आयुर्विमा महामंडळाला (Life Insurance Corporation of India) राज्य कर उपायुक्त, मुंबई यांच्याकडून ही GST नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की ते या नोटिशीच्या विरोधात अपील दाखल करणार आहेत. कंपनीवर इनपुट टॅक्स क्रेडिटच्या नॉन रिव्हर्सल नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा

जीएसटी भरण्याची नोटीस मिळाल्यानंतर, एलआयसीने सांगितले की ते निर्धारित वेळेत मुंबईतील आयुक्तांसमोर अपील दाखल करणार आहेत. मात्र, या GST नोटिसीचा कंपनीच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर कोणत्याही कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही एलआयसीने स्पष्ट केले आहे. 

ऑक्टोबर 2023 मध्ये मिळाली होती 37 हजार कोटी रुपयांची नोटीस

यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये एलआयसीला सुमारे 37 हजार कोटी रुपयांचा जीएसटीचा भरणा करण्याचा आदेश पाठवण्यात आला होता. सरकारी कंपनीवर 2019-20 च्या मूल्यांकन वर्षात काही इनव्हॉईसवर 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के दराने कर भरल्याचा आरोप होता. श्रीनगरच्या राज्य आयकर अधिकाऱ्याने कंपनीवर 10462 कोटी रुपयांचा जीएसटी, 20 हजार कोटी रुपयांचा दंड आणि 6,382 कोटी रुपयांचे व्याज आकारले होते.

ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्येही आल्या नोटिसा 

याआधीही ऑक्टोबरमध्ये एलआयसीला 84 कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये 290 कोटी रुपयांच्या आयकर दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. एका बाजूला जीएसटीची नोटीस आली असताना दुसरीकडे सोमवारी बीएसईवर एलआयसीचे शेअर्स 3.1 टक्क्यांनी वधारले. सोमवारी दिवस अखेर 858.35 रुपयांवर एलआयसीचा शेअर दर स्थिरावला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget