लाडकी बहिण योजनेसाठी आत्तापर्यंत किती महिलांनी केली नोंदणी पूर्ण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु होऊन एक महिना पूर्ण झालाय. येत्या 17 ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
![लाडकी बहिण योजनेसाठी आत्तापर्यंत किती महिलांनी केली नोंदणी पूर्ण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली सविस्तर माहिती Ladki Bahin Yojana News 1 crore 40 lakh women in the Maharashtra have completed registration for Ladki Bahin Yojana says Chief Minister Eknath Shinde लाडकी बहिण योजनेसाठी आत्तापर्यंत किती महिलांनी केली नोंदणी पूर्ण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली सविस्तर माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/28c7e492c9d475cb1d27190c08a265101723613566073339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ladki Bahin Yojana Update news : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु होऊन एक महिना पूर्ण झालाय. येत्या 17 ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यातील 1 कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी पूर्ण झाली आहे, याबाबतची माहिती खु्द्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. हे सगळं शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या योजनेसाठी सरकारनं 33 हजार कोटी आर्थिक तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारनं विविध योजना सुरु केल्या
लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, तीर्थदर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. या योजनेत मोठ्या प्रमाणात ममहिलांनी सहभाग घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांची बँक खाती आणि आधारकार्ड जोडण्याच्यादृष्टीने व्यापक मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याद्या दिल्या जाणार असून दोन दिवसांत जोडणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार? मुख्यमंत्री शिंदेंची नवी माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)