Hot IPO's of 2021: 'या' आयपीओची झाली होती जोरदार चर्चा
Top IPO's in 2021 : यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले होते.
IPO's Created Buzz In 2021: भारतीय शेअर बाजारासाठी 2021 हे वर्ष चांगले राहिले. या वर्षी मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने 62,000 हा विक्रमी उच्चांकही गाठला होता. तर, निफ्टीने 18,604 हा उच्चांक गाठला होता. या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले. या आयपीओंना चांगला प्रतिसादही मिळाला. सध्याच्या वर्षीत 63 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून एक लाख 18 हजार 704 कोटी रुपये जमवले. मागील वर्षीची तुलनेत 4.5 पट अधिक रक्कम आहे.
वर्ष 2021 मध्ये देशातील प्रसिद्ध, दिग्गज स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा बोलबाला राहिला. यातील काही आयपीओंनी आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला. तर, काहींनी निराशा केली. जाणून घेऊयात पाच आयपीओ, ज्यांची जोरदार चर्चा झाली.
1. Zomato
ऑनलाइन फू़ड डिलिव्हरी कंपनी Zomato चा आयपीओ या वर्षी बाजारात आला होता. कंपनीने बाजारातून आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपये जमवले. आयपीओला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आयपीओ 38 पटीपेक्षा जास्त ओव्हरसब्सक्राइब झाला होता. स्टॉक मार्केटमध्ये लिस्टींगही चांगली झाली. इश्यू प्राइसपेक्षा 53 टक्के अधिक प्रीमियम दरावर आयपीओ लिस्ट झाला. सध्या झोमॅटोचा शेअर 138 रुपयांवर ट्रे़ड करत आहे.
2. Nykaa
ऑनलाइन ब्यूटी ई-कॉमर्स कंपनी Nykaa च्या आयपीओची जोरदार चर्चा झाली. इन्व्हेस्टमेंट बँकर फाल्गुनी नायर यांनी सुरू केलेल्या कंपनीचा 5352 कोटी रुपयांचा आयपीओ आला होता. आयपीओ हा 82 पटीने ओव्हरसब्क्राइब झाला होता. स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंगही धमाकेदार झाला. आयपीओतील इश्यू प्राइजपेक्षा 79 टक्क्यांनी Nykaa ची लिस्टिंग झाली. सध्या Nykaa 2012 रुपये प्रति शेअर या दरावर ट्रे़ड करत आहे.
3. PB Fintech (Policybazaar)
PB Fintech ही कंपनी ऑनलाइन विमा विक्री करणारी कंपनी आहे. PB Fintech ने आयपीओच्या माध्यमातून 5710 कोटी रुपये जमवले. आयपीओ 16 पटीने सब्सक्राइब झाला आणि स्टॉक एक्सचेंजवर 17.35 टक्के प्रीमियम दरावर PB Fintech लिस्टिंग झाला. सध्या हा शेअर पुन्हा एकदा आपल्या इश्यू प्राइजच्या जवळच्या किंमतीवर ट्रेड करत आहे.
4. Paytm
देशातील सर्वात मोठी Fintech कंपनींपैकी एक असलेल्या पेटीएम कंपनीने आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात आणला आहे. पेटीएमने आयपीओच्या माध्यमातून 18,300 कोटी रुपये उभारले. मात्र, आयपीओला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पेटीएमचा आयपीओ 1.89 पटीने सब्सक्राइब झाला. मात्र, आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांची मोठी निराशा झाली. इश्यू प्राइसपेक्षा खाली येऊन पेटीएमचा शेअर लिस्ट झाला. ़ॉ
5. Paras Defence and Space Technologies
पारस डिफेन्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी कमी रक्कमेचा आयपीओ बाजारात आणला होता. कंपनीने 171 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून जमवले होते. मात्र, पारस डिफेन्सची बाजारातील लिस्टिंग एकदम दमदार राहिली. आयपीओ 304 पटीने ओव्हरओवरसब्सक्राइब झाला आणि इश्यू प्राइसपेक्षा 171 टक्क्यांनी वधारत शेअर स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाला.