Gold Silver Price Today 9 December 2021: सोने, चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today : औद्याोगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढली आहे. त्याशिवाय विवाह सोहळ्यामुळेदेखील सोने व चांदीची मागणी वाढली आहे.
Gold Silver Price Today 9 December 2021: अमेरिकन डॉलरचा दर वधारल्याने मागील काही दिवसांपासून सोन्यावर दबाव वाढला होता. मात्र, आज सोने आणि चांदी वधारले आहेत. देशात सोन्याची मागणी वाढत असून त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून आला. सोने आणि चांदीचा दर वाढला आहे.
आजचे दर काय?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी (MCX)सोन्याचा वायदा बाजारातील दर 62 रुपयांनी वधारला होता. सोन्याचा दर 48 हजार 117 रुपयांवर पोहचला होता. मागील वर्षी सोन्याने 55 हजार रुपये प्रति तोळे इतका दर गाठला होता. सध्या सोने आपल्या ऐतिहासिक दरापेक्षा आठ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोने खरेदी सध्या आर्कषक पातळीवर पोहोचला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय लोकांकडून निवडला जाऊ शकतो.
चांदीची किंमत वधारली
सिल्वर मेटलमध्ये चांदीच्या दरात 57 रुपयांची वाढ दिसून आली. वायदे बाजारात 61 हजार 680 रुपये प्रतिकिलो इतका दर आहे. औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी वाढत असल्याचे दर वाढत असल्याचे म्हटले जात आहे. विवाह सोहळ्यास सुरुवात झाल्याने सोने आणि चांदीची खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- RBI गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, डिजीटल करन्सी येणार, पण....
- महागाईचा भडका उडणार? आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ
- 900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या बॉसला उपरती, माफी मागत म्हणाला...
- ATM Cash Withdrawal Charge : 1 जानेवारीपासून ATM मधून कॅश काढणं महागणार; जाणून घ्या नियम काय?
- लवकरच Nifty 50 आणि बँक निफ्टीत बदल, जाणून घ्या कोणता स्टॉक असेल इन अन् कोणता आऊट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha