एक्स्प्लोर

देशभरात करवा चौथचा उत्साह, 22 हजार कोटींची उलाढाल, दिवाळीला व्यवसाय 4 लाख कोटींच्या पुढं जणार

आज करवा चौथचा सण देशभरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाली आहे.

Karwa Chauth News : आज करवा चौथचा सण देशभरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. कपडे, दागिने, मेकअप, पूजा साहित्य आणि भेटवस्तू यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचीही चांगली विक्री झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या अंदाजानुसार, करवा चौथच्या मुहूर्तावर 22 हजार कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 30 टक्क्यांनी अधिक आहे. दिवाळीपर्यंत सणासुदीच्या काळात देशात 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा कॅटचा अंदाज आहे.

दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा करतात

हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सव, व्रत-वैकल्याला धार्मिक महत्व आहे. आज 20 ऑक्टोबर 2024 रोजी करवा चौथ व्रत पाळले जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी रविवारी निर्जळी उपवास करण्यात येणार आहे. या दिवशी महिला दिवसभर पाण्याचा एक थेंबही पीत नाहीत. दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो.

लोक दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहेत, मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. लोक त्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. लोक आपली घरे सजवण्यासाठी यातून भरपूर खरेदी करत आहेत. बाजारपेठेत स्वदेशी मालाला अधिक मागणी आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये मेड इन इंडिया उत्पादनांचा दबदबा आहे. काही ठिकाणी महिला मेहंदी लावत आहेत तर काही ठिकाणी बांगड्या खरेदी करत आहेत. नवनवीन व्हरायटीचे कपडे, शूज आणि घर सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठीही अनेक अनोख्या वस्तू आहेत. त्यामुळेच लोक यावेळी दिवाळीची जोरदार तयारी करत आहेत.

पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत 

विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करतात. यावेळी करवा चौथ व्रताची खास गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येने पुरुषांनीही आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास केला आहे. ही परंपरा आता केवळ महिलांपुरती मर्यादित राहिली नाही, तर पुरुषांनीही या सणाचे महत्त्व समजून सहभाग घेतला. विशेषत: तरुण पिढीमध्ये या उपोषणाबाबत अधिक उत्साह दिसून आला. तरूणांनी या बाबतीत ज्येष्ठांनाही मागे टाकले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Karva Chauth 2024: पहिल्यांदाच करवा चौथचा उपवास करताय? नवविवाहितांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल? उपवासात काय करू नये?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
Cyclone Dana : परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, मुसळधार पावसाचाही इशारा
परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, मुसळधार पावसाचाही इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrakant Patil Full Speech : मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले..चंद्रकात पाटलांचा गौप्यस्फोटMuddyach Bola :मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कुणाची हवा?अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोलाRaj Thackeray Full Speech : 5 मनिटांचं भाषण, दोन उमेदवार जाहीर; राज ठाकरेंचा मास्टरस्ट्रोकGulabrao Patil Full Speech : आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे, शिंदेंचा मेळावा गुलाबरावांनी गाजवला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
Cyclone Dana : परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, मुसळधार पावसाचाही इशारा
परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, मुसळधार पावसाचाही इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी
निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार
निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीपासून मुंबईपर्यंत भाजपमध्ये बंडाळी; आणखी एक माजी आमदार बंडखोरीच्या तयारीत, फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर
सांगलीपासून मुंबईपर्यंत भाजपमध्ये बंडाळी; आणखी एक माजी आमदार बंडखोरीच्या तयारीत, फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर
Maharashtra Assembly Elections 2024 : राज ठाकरेंकडून 2 उमेदवारांची घोषणा, मनसेच्या दुसऱ्या यादीचाही मुहूर्त ठरला; ठाण्यातून खास शिलेदाराला संधी
राज ठाकरेंकडून 2 उमेदवारांची घोषणा, मनसेच्या दुसऱ्या यादीचाही मुहूर्त ठरला; ठाण्यातून खास शिलेदाराला संधी
Raj Thackeray on Avinash Jadhav: ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी, राज ठाकरे यांची घोषणा
Raj Thackeray on Avinash Jadhav: ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी, राज ठाकरे यांची घोषणा
Embed widget