Jet Airways : जेट एअरवेज सज्ज! पुन्हा घेणार आकाशात भरारी; 'या' दिवसापासून होणार नवी सुरुवात
जेट एअरवेजच्या (Jet Airways) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जेट एअरवेजची विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.
Jet Airways : जेट एअरवेजच्या (Jet Airways) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जेट एअरवेजची विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. गेल्या 4 वर्षांपासून जेट एअरवेजची सेवा बंद होती. आता ती पुन्हा सुरु होणार आहे. जेट एअरवेजवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी न्यायालयाने JKC ला एकूण 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आदेश दिले होते.
गेल्या 4 वर्षांपासून बंद असलेली जेट एअरवेज लवकरच आकाशात भरारी घेणार आहे. जालान कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) ने एअरलाइन्समध्ये 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या प्रवर्तकाने विमान कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी एकूण 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले होते. या गुंतवणुकीनंतर, जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ते 2024 पर्यंत एअरलाइन्सची सेवा पुन्हा सुरु होणार आहे.
गुंतवणुकीची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत होती
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने दिवाळखोरी कायद्यांतर्गत जून 2021 मध्ये जेट एअरवेजसाठी बोली लावली होती. यामध्ये जालान-कलरॉक कंसोर्टियमने सर्वात मोठी बोली लावली होती. कंसोर्टियमने एअरलाइन्स पुन्हा सुरू करण्यासाठी एकूण 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची बोली लावली होती. 31 ऑगस्टपर्यंत 100 कोटी रुपये आणि 30 सप्टेंबरपर्यंत पुढील 100 कोटी रुपये गुंतवणार असल्याचे जेकेसीने न्यायालयात सांगितले होते. उर्वरित 150 कोटी रुपये परफॉर्मन्स बँक गॅरंटी (PBG) स्वरूपात दिले जात आहेत.
2019 पासून विमान सेवा बंद
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजने 17 एप्रिल 2019 पासून सर्व उड्डाणे बंद केली होती. या एअरलाइनची स्थापना नरेश गोयल यांनी 1990 मध्ये केली होती. एअर इंडियाला पर्याय म्हणून त्याची सुरुवात यावेळी करण्यात आली. एक काळ असा होता जेव्हा या एअरलाइन्सकडे एकूण 120 हून अधिक विमाने होती. ही कंपनी दररोज 650 हून अधिक उड्डाणे चालवत होती.
विमानसेवा कधी सुरू होईल?
जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम ही UAE स्थित उद्योगपती मुरारी लाल जालान यांची कंपनी आहे. Kalrock Capital Partners ही UK स्थित कंपनी आहे, जी शक्य तितक्या लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करून विमानसेवा सुरू करू इच्छिते. JKC ची योजना आहे की जेट एअरवेज 2024 पासून त्यांचा व्यवसाय सुरू करू शकेल. यासाठी कंपनी विमान उत्पादक कंपन्या, पायलट संघटना आणि विमानतळ प्राधिकरणाशी सतत चर्चा करत आहे. 2024 मध्ये एअरलाइन्सची सेवा सुरु करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: