Jio plan : जिओ ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी! सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन केला सुरु, नेमके काय मिळणार फायदे?
मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Jio plan News : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सुरु केला आहे. या प्लॅनची किंमत फक्त 91 रुपये आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन डेटा व्हाउचर नाही. याचा अर्थ असा की 91 रुपयांमध्ये तुम्हाला फक्त डेटाच नाही तर कॉलिंग आणि एसएमएसचाही फायदा मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेव्यतिरिक्त या जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळतील याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओचा 91 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाकडेही जिओइतका स्वस्त रिचार्ज प्लॅन नाही. 91 रुपयांच्या प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना इतरही फायदे मिळणार आहेत. ग्राहकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे.
रिलायन्स जिओ 91 प्लॅनबाबत माहिती
91 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 एमबी डेटा देते, याशिवाय, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 200 एमबी अतिरिक्त डेटा आणि 500 एसएमएसचा फायदा मिळतो. 91 रुपयांमध्ये, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 3 जीबी डेटाचा फायदा मिळेल, डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, स्पीड लिमिट 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.
जिओ 91 प्लॅनची वैधता
रिलायन्स जिओच्या 91 रुपयांच्या प्लॅनसह, कंपनी 28 दिवसांची वैधता देते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की हा प्लॅन फक्त जिओफोन आणि जिओफोन प्राइम सदस्यांसाठी आहे. 91 रुपयांच्या या परवडणाऱ्या प्लॅनसह, जिओ क्लाउड स्टोरेज आणि जिओ टीव्हीचा मोफत प्रवेश दिला जातो. रिलायन्स जिओचा 91 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाकडेही जिओइतका स्वस्त रिचार्ज प्लॅन नाही.
जिओ फोन रिचार्ज प्लॅन
91 रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त, कंपनीकडे 75 रुपयांचा आणखी एक परवडणारा प्लॅन आहे जो 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 0.1 जीबी हाय स्पीड डेटा, 200 एमबी बोनस डेटा, 50 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग बेनिफिट मिळते. 75 रुपयांच्या जिओ प्लॅनसह, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेजचा बेनिफिट दिला जातो. 100 रुपयांव्यतिरिक्त, रिलायन्स जिओमध्ये 125 रुपये, 152 रुपये, 186 रुपये, 223 रुपये आणि 895 रुपयांचे रिचार्ज प्लॅन देखील जिओ फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. खास गोष्ट म्हणजे 895 रुपयांचा प्लॅन तुम्हाला 336 दिवसांच्या वैधतेसह कमी किमतीत उपलब्ध असेल.
महत्वाच्या बातम्या:























