Jet Airways: जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात तर काहींना बिनपगारी रजा, कंपनीचा मोठा निर्णय
Jet Airways : जेट एअर लाईन्सच्या काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आलीय तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आलीय.
Jet Airways: जगभरात मंदीचे ढग दाटू लागले आहेत. शेअर बाजारात अस्थिरतेच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. एकीकडे जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याची योजना असताना या कंपनीच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आलीय किंवा त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आलंय. कंपनीचे सीईओ संजीव कपूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी 1 डिसेंबरपासून या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जेट एअर लाईन्सचे अडीचशे कर्मचारी आहेत. त्यापैकी कुणालाही नोकरीवरून काढण्यात येणार नाही. पण काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आलीय तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आलीय. 2019 मध्ये कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षी जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि त्याला मान्यताही मिळाली आहे.
To set the record straight (as many numbers and %s flying about):
— Sanjiv Kapoor (@TheSanjivKapoor) November 18, 2022
1. Two-thirds of staff not impacted at all
2. Of the remaining one-third, most will be on temp pay reduction.
3. Only a small portion of the total (~10%) will be on temp LWP.
4. No staff let go.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. सीईओ आणि सीएफओच्या पगारात जास्त कपात करण्यात येणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात तात्पुरती कपात तसेच काहींना बिनपगारी रजेवर 1 डिसेंबरपासून पाठवण्यात येणार आहे. जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, कंपनीतील 10 टक्क्याहून कमी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय तात्पुरत्या रजेवर पाठवण्यात येणार आहे. तसेच एक तृतीयांश कर्मचारी तात्पुरत्या वेतन कपातीवर असतील. सीईओ संजीव कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तृतीयांश कर्मचार्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही किंवा कोणत्याही कर्मचार्याला कंपनी सोडण्यास सांगितले गेले नाही. जेट एअरवेजमध्ये सध्या 250 कर्मचारी काम करतात.
Byju's कंपनीचा मोठा निर्णय, 2 हजार 500 कर्मचाऱ्यांना देणार 'नारळ'
देशातील सर्वात मोठी एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बायजू (Byju) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च 2023 पर्यंत 5 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय Byju नं घेतला आहे. तर दुसरीकडे 10 हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही कंपनीनं घेतला आहे. ही कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे