एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Income Tax Return : उरले काही तास, आयकर आजच भरा, आणखी मुदवाढ नाहीच!

ITR Filing Last Date : आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही.

ITR Filing Last Date : आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही. आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर 2021 हीच असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून महसूल सचिव तरुण बजाज यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या निर्णायानंतर आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की, 'आयकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही.'  31 डिसेंबरनंतर आयकर विवरणपत्र (IT Return) दाखल करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. 

अधिकृत संकेतस्थळवर विवरणपत्र दाखल करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यावर निर्णय होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण केंद्र सरकारकडून स्पष्ट शब्दात कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आता आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत.   31 डिसेंबर 2021 नंतर आयकर विवरणपत्र (IT Return) दाखल करणाऱ्यांना मात्र दंड भरावा लागणार आहे. 
 
महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की, 'आयकर विवरणपत्र दाखल करण्याचं काम व्यवस्थित सुरु आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 5.62 कोटी आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त रिटर्न फाईल करम्यात आले आहेत. त्याशिवाय यंदा 60 लाख अतिरिक्त रिटर्न दाखल झाला आहे.'  

आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी वाट पाहणाऱ्यांना आता नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष करण्याऐवजी इनकम टॅक्स रिटर्न  भारण्याचं काम करावे लागेल. कारण आयटीआर न भरल्यास नव्या वर्षाचा उत्सव मावळेल, अन् दंडांला समोरं जावे लागेल.  आयकर विवरणपत्र दाखल न केल्यास पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 

टॅक्स भरताना कोणती काळजी घ्याल?

टॅक्सची अचूक माहिती द्या 
आयटी रिटर्न्स भरताना टॅक्सची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. यातून अॅडव्हान्स टॅक्स, टीडीएसची माहिती सरकारला द्यावी लागते. जर कमी टॅक्स भरला तर आयटी रिटर्न्समध्ये टॅक्स भरण्याची संधी मिळेल. तसंच जास्त टॅक्स जमा झाला असेल तर रिफंड मागितला जाऊ शकतो. 

वर्ष आणि फॉरमॅट तपासून घ्या
आयटी रिटर्न्स भरताना मूल्यनिर्धारण वर्ष आणि त्याचा फॉरमॅट नीट तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या टॅक्सपेअर्ससाठी फॉरमॅटही वेगळा असतो. तसंच प्रत्येक वर्षी हा फॉरमॅट बदललाही जातो. म्हणूनच तुमचा फॉरमॅट नीट तपासून घेणं गरजेचं आहे.

मिळालेल्या व्याजाचाही उल्लेख करा 
तुमच्या सेव्हिंग बँक अकाऊंटवर आणि फिक्स डिपॉझिटवर जे व्याज मिळालं असेल त्याचाही  उल्लेख फॉर्ममध्ये करा. व्याजातून मिळालेली रक्कम तुमच्या ग्रॉस इनकममध्ये अॅड करणं गरजेचं आहे. तुमची बँक स्टेटमेंट्स तपासली तर ही व्याजाची रक्कम जाणून घेण्यासाठी मदत होऊ शकेल. 

अचूक बँक डिटेल्स   
आयटी रिटर्न्स भरताना अचूक बँक डेटल्स पुरवणं हेदेखील फार महत्वाचं आहे. चुकीची बँक डिटेल्स दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही सर्व काळजी घेतली तर तुम्हाला आयटी रिटर्न्स भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करणं सोपं होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget