IPO Updates : सोलर कंपनीचा आयपीओ खुला होणार, एका शेअरमागं 1280 रुपयांचा फायदा मिळण्याचा अंदाज, GMP मध्ये बोलबाला
Waaree Energies IPO : शेअर बाजारात पुन्हा एकदा आयपीओचं लिस्टींग सुरु झालं आहे. ह्युंदाई नंतर वारी एनर्जीज कंपनीचा आयपीओ येणार आहे.
Waaree Energies IPO मुंबई : भारतीय शेअर बाजारात सध्या ह्युंदाई कंपनीचा आयपीओ खुला झाला आहे. या आयपीओनंतर सोलर क्षेत्रातील आणकी एका कंपनीचा आयपीओ येणार आहे. वारी एनर्जीज या कंपनीचा आयपीओ 21 ऑक्टोबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओत गुंतवणुकीसाठी 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. वारी एनर्जीज या आयपीओद्वारे 4321.44 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
वारी एनर्जीजच्या आयपीओच्या एका समभागाचं मूल्य 1503 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. हा आयपीओ खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये दमदार प्रतिसाद मिळत आहे. वारी एनर्जीजच्या आयपीओवर ग्रे मार्केटमध्ये 85 टक्के अधिक प्रीमियमवर ट्रेड सुरु आहे. वारी एनर्जीजचा आयपीओ 28 ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर होणार आहे.
जीएमपीमध्ये 1280 रुपये प्रिमियम
वारी एनर्जीजनं आयपीओमध्ये एका शेअरची किंमत 1503 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओचा एक शेअर्स 1280 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. जीएमपीच्या हिशोबानं विचार केला असता वारी एनर्जीजचा शेअर 2783 रुपयांनी लिस्ट होऊ शकतो. सध्या एका शेअरवर 85 टक्के फायदा दिसत आहे. वारी एनर्जीज आयपीओच्या माध्यमातून 4321.44 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
या आयपीओचे लीड मॅनेजर्स अॅक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्यूरिटीज, जेफरीज इंडिया, नोमुरा फायनान्शिअल अॅडवायजरी अँड सिक्यूरिटीज, एसबीआय कॅपिटल्स मार्केटस, इंन्टेसिव फिक्सल सर्व्हिसेस, आयटीआय कॅपिटल हे लीड मॅनेजर्स आहेत.
वारी एनर्जीजच्या एका आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार 1 लॉट ते 14 लॉटसाठी पैसे लावू शकतात. वारी एनर्जीजच्या एका लॉटमध्ये आयपीओमध्ये 9 शेअर आहेत. एका लॉटसाठी 13527 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
वारी एनर्जीजची स्थापना 1990 मध्ये झाली होती. सोलर पीवी मॉड्यूल्सचं उत्पादन करते. 30 जून 2023 च्या रिपोर्टनुसार वारी एनर्जीजचे चार यूनिट आहेत. सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ लिस्ट झाले होते. आता पुन्हा एकदा आयपीओ येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलर क्षेत्रातील प्रीमियम एनर्जीजचा आयपीओ आला होता, गुंतवणूकदारांनी त्याला देखील दमदार प्रतिसाद दिला होता.
इतर बातम्या :
15 ऑक्टोबरपासून पैशांचा पडणार पाऊस? आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)