(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPO: सुला विनयार्ड्सचा आयपीओ 12 डिसेंबर रोजी लॉन्च होणार, जाणून घ्या डिटेल्स
Sula Vineyards IPO: नाशिककरांसाठी (Nashik) महत्वाची बातमी असून देशासह जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सुला वाइनयार्ड्सचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) 12 डिसेंबरला लॉंच होणार आहे.
मुंबई: भारतातील सर्वात मोठी वाईन उत्पादक कंपनी सुला विनयार्ड्स 12 डिसेंबर रोजी त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Sula Vineyards IPO) लाँच करणार आहेत. कंपनीच्या आयपीओचे सबस्क्रिप्शन 14 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीओआधी अँकर गुंतवणूकदारांना 9 डिसेंबर रोजी सुला विनयार्ड्सवर बोली लावण्याची परवानगी दिली जाईल. कंपनीने अद्याप त्यांच्या आयपीओची किंमत बँड जाहीर केलेली नाही परंतु ते योग्य वेळी जाहीर करतील.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, कंपनी 26,900,530 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ऑफर करेल. आयपीओ पूर्णपणे OFS म्हणजेच ऑफर फॉर सेल असल्याने उत्पन्न कंपनीकडे जाणार नाही. आयपीओमध्ये इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये असेल.
हे आयपीओचे अकाउंट बुक असेल
आयपीओ आकाराच्या 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) बोली लावण्यासाठी वाटप केले जाईल, तर 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी (NIIs) राखीव असतील आणि उर्वरित 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ठेवले जाईल
कंपनी मद्य उद्योगात बाजारपेठेत आघाडीवर
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, CLSA इंडिया आणि IIFL सिक्युरिटीज हे सुला विनयार्ड्स आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजीज ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. सुला व्हाइनयार्ड्स भारतीय वाइन उद्योगातील बाजारपेठेत आपले स्थान सतत टिकवून आहे.
कंपनीबद्दल सविस्तर माहिती
सुला विनयार्ड्सने एका दशकाहून अधिक काळात उल्लेखनीय प्रगती केली आहे. 100 टक्के द्राक्ष वाइन श्रेणीमध्ये, महसुलावर आधारित कंपनीचा बाजारातील हिस्सा FY09 मध्ये 33 टक्क्यांवरून FY20 मध्ये 52 टक्के आणि FY21 मध्ये 52.6 टक्क्यांवर गेला. सध्या, कंपनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असलेल्या चार मालकीच्या आणि दोन भाडेतत्त्वावरील उत्पादन सुविधांमध्ये 13 कोर ब्रँडमध्ये 56 वेगवेगळ्या लेबल्सच्या वाईनचे उत्पादन करते.
टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये त्याचा प्रवेश वाढेल
कंपनीने सांगितले की, आयात आणि वितरण करत असलेल्या ब्रँडवर लक्ष केंद्रित करत राहील. याशिवाय कंपनी भारतातील टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये आपला प्रवेश वाढवेल.